नवी दिल्ली, 27 जानेवारी : गेल्या वर्षात कोरोना व्हायरसमुळे भारतात नोकरीच्या संधी कमी झाल्या असल्या, तरी आता एका सर्वेक्षणानुसार, 53 टक्के कंपन्यांचं असं म्हणणं आहे की, 2021 मध्ये ते आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याच्या तयारीत आहेत. भारतात 74 टक्क्यांहूनही अधिक टेक कंपन्या आपल्या स्टाफची संख्या 14 टक्केहून अधिक वाढवण्याच्या विचारात आहेत. प्रोफेशनल सर्व्हिस देणारी फर्म मायकल पेज इंडिया टॅलेंट ट्रेंड्स 2021 रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं की, भारतात कमीत कमी 53 टक्के कंपन्या 2021 मध्ये नवी भरती करण्याच्या तयारीत आहे.
रिपोर्टनुसार, 2020 मध्ये कोरोना काळात भरतीसंबंधी प्रक्रियेत 18 टक्के कमी आली होती. मायकल पेज इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक निकोलस डुमॉलिन यांनी सांगितलं की, तंत्रज्ञान आणि आरोग्य क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामकाज पाहिलं गेलं आहे. त्याशिवाय इंटरनेट आधारित व्यवसाय ई-कॉमर्स आणि शिक्षण टेक्नोलॉजी क्षेत्रातही अधिक मागणी चालू राहण्याची शक्यता आहे.
रिपोर्टनुसार, 60 टक्के कंपन्यांनी या वर्षात वेतन वाढ करण्याचं सांगितलं आहे. या सर्व्हेमध्ये सामिल 43 कंपन्यांनी ते एका महिन्याच्या सॅलरीहून अधिक बोनस देण्याबाबत विचार करत असल्याचंही सांगितलं. भारतात ऍडव्हान्स टेक्नोलॉजी असल्याकारणाने सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, गेमिंग आणि आयटी इंडस्ट्रीच्या इतर सेगमेंटमध्ये तेजी आहे.
सॅलरी हाईकमध्ये या वर्षात सर्वाधिक हेल्थकेअर सेक्टरमध्ये 8 टक्के वाढीची शक्यता आहे. त्यानंतर फास्ट मूव्हिंग कंज्यूमर गुड्स सेक्टरमध्ये 7.6 टक्के तेजी आणि ई-कॉमर्समध्ये 7.5 टक्के वाढीची शक्यता आहे.
या कंपन्यांमध्ये होणार भरती -
देशातील चार सर्वात मोठ्या आयटी कंपन्या TCS, Infosys, HCL आणि Wipro ने ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीमध्ये 36487 कर्मचाऱ्यांची भरती केली आहे. गेल्या वर्षात या चार कंपन्यांनी मिळून केवळ 10820 कर्मचाऱ्यांची भरती केली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षात हायरिंगमध्ये 240 टक्क्यांची वाढ झाली आहे. भरतीची ही प्रक्रिया पुढील वर्षातही अशीच सुरू राहणार असल्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार, पुढील वर्षात या चार कंपन्या जवळपास 91000 फ्रेशर्स हायर करण्याची योजना आखत आहेत.