नवी दिल्ली, 26 जानेवारी : भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी भारतीय जीवन विमा महामंडळ अर्थात LIC चांगला पर्याय मानला जातो. एलआयसी पॉलिसीअंतर्गत केवळ इन्शोरन्स कव्हर मिळणार नाही, तर भविष्यासाठी चांगली रक्कम जमा करण्यासही मदत मिळेल. सध्या एलआयसीच्या अनेक पॉलिसी पॉप्युलर आहेत. काही पॉलिसी लाँग टर्म तर काही छोट्या कालावधीसाठी आहेत. जर छोटी गुंतवणूक करायची असेल, तर न्यू मनीबॅक पॉलिसी एक चांगला पर्याय आहे.
एलआयसीची न्यू नवी बॅक पॉलिसी एक नॉन लिंक्ड इन्शोरन्स पॉलिसी आहे, जी चांगले रिटर्स आणि बोनस देते. या पॉलिसीची खास बाब म्हणजे यात दर पाच वर्षांनी मनी बॅक, मॅच्योरिटीमध्ये चांगले रिटर्स आणि टॅक्स इन्शोरन्स बेनिफिटही मिळतात.
ही पॉलिसी पूर्णपणे टॅक्स फ्री पॉलिसी आहे. याच्या व्याज, प्रीमियम पेमेंट आणि मॅच्योरिटीवर मिळणाऱ्या रकमेवर कोणताही टॅक्स लागत नाही. या प्लॅनमध्ये जर तुम्ही 25 वर्षापर्यंत दररोज 160 रुपये गुंतवणूक केल्यास, 25 वर्षांनंतर 23 लाख रुपयांपर्यंत रक्कम मिळेल.
LIC नुसार, हा प्लॅन 13 ते 50 वर्षापर्यंत कोणताही व्यक्ती घेऊ शकतो. या प्लॅनमध्ये प्रत्येक पाचव्या वर्षी म्हणजे 5, 10, 15 आणि 20व्या वर्षी 15-20 टक्के मनी बॅक मिळेल. परंतु ज्यावेळी प्रीमियम कमीत कमी 10 टक्के जमा असेल, त्यावेळीच हे मिळू शकेल.
तसंच मॅच्योरिटीवेळी गुंतवणूकदारांना बोनस मिळेल. एकूण 10 लाख रुपयांच्या या प्लॅनमध्ये एक्सिडेंटल डेथचाही फायदा मिळतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Money