• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • 'या' बँकांमधल्या तुमच्या पैशावर आता मिळणार कमी व्याज

'या' बँकांमधल्या तुमच्या पैशावर आता मिळणार कमी व्याज

तुम्ही बँकेत फिक्स्ड डिपाॅझिट म्हणजेच एफडी करायचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

 • Share this:
  मुंबई, 18 जून : तुम्ही बँकेत फिक्स्ड डिपाॅझिट म्हणजेच एफडी करायचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. देशाच्या अनेक मोठ्या खासगी आणि सरकारी बँकांनी व्याजदरांबद्दल मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन दिवसांत ICICI बँकेनंतर बंधन बँकेनंही आपले व्याज दर कमी केलेत. बंधन बँकेनं गेल्या 4 वर्षातल्या छोट्या कर्जावर व्याज दरात एकूण 4.45 टक्के कपात केलीय. याशिवाय ICICI बँकेत जमा असलेल्या व्याज दरावर 0.10 ते 0.25 टक्के कपात केलीय. एक्सिस बँकेनंही व्याज दरावर 0.15 टक्के कपात केलीय. का झाला बदल? रेपो रेटमध्ये कपात झाल्यानं ICICI बँक, एक्सिस बँक आणि बंधन बँक यांनी हे पाऊल उचललं. त्याचा परिणाम ग्राहकांवर होईल. भारतात नोकरी करण्याची भारी संधी, या 10 कंपन्यांबद्दल एकदा जाणून घ्याच जमा दरांवर 0.25 टक्के कपात म्हणजे कोणी ग्राहक बँकेत पैसे जमा करेल तर त्याला मिळणारा व्याज दर 0.25 टक्के कमी होईल. ज्यांनी आधी एफडी केलीय, त्यांना काही फरक पडणार नाही. 'ही' आहे लोकप्रिय काॅलेजेसची कटऑफ लिस्ट, काॅमर्सला जास्त पसंती कर्जावरही व्याज दर कमी केला गेला, तर त्याचा फायदा कर्जदाराला होईल. त्यांना व्याज दरांच्या हिशेबानं गृहकर्ज आणि आॅटो लोवर ईएमआय द्यावा लागेल. पुन्हा बांगलादेशचा संघ ठरला जायंट किलर, वेस्ट इंडिज विरोधात केले 'हे' रेकॉर्ड ICICI बँकेनं FDवर कमी केलं व्याज दर बँकेनं जमा केलेल्या व्याज दरांवर 0.10 पासून 0.25 टक्के कपात केलीय. बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार 290 दिवसांपासून 1 वर्षापर्यंत जमा केलेल्या 2 कोटी रुपयांवरच्या जमेवर बँक 6.75 टक्के व्याज देईल. 2 वर्ष ते 3 वर्षापेक्षा कमी कालावधीवर जमा केलेल्या रकमेवर  7.30 टक्के व्याज मिळेल. एक्सिस बँकेनं कमी केले FD वर व्याज दर बँकेच्या प्रवक्त्यानं सांगितलं की बँकेनं एक वर्षांसाठी जमा केलेल्या व्याज दरावर कपात केलीय. VIDEO : शेतकरी कर्जमाफीवरून सरकारवर टीका, अजित पवार म्हणाले...
  First published: