• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • भारतात नोकरी करण्याची भारी संधी, या 10 कंपन्यांबद्दल एकदा जाणून घ्याच

भारतात नोकरी करण्याची भारी संधी, या 10 कंपन्यांबद्दल एकदा जाणून घ्याच

रँडस्टॅड एम्प्लाॅयर ब्रँड रिसर्च 2019 नुकताच प्रसिद्ध केला गेला

 • Share this:
  मुंबई, 18 जून : नुकतीच नोकरी करण्यासाठी सर्वोत्तम असलेल्या कंपनींची यादी जाहीर झालीय. त्यात ई काॅमर्स कंपनी अमेझाॅन इंडिया देशातली सर्वात आकर्षक एम्प्लाॅयर ब्रँड मानली जातेय. एका सर्वेक्षणातून ही गोष्ट समोर आलीय. या यादीत मायक्रोसाॅफ्ट इंडिया दुसऱ्या स्थानावर आणि सोनी इंडिया तिसऱ्या स्थानावर आहे. रँडस्टॅड एम्प्लाॅयर ब्रँड रिसर्च 2019 नुकताच प्रसिद्ध केला गेला. यानुसार आर्थिक परिस्थिती, उपयोग आणि प्रतिष्ठा यात अमेझाॅन इंडिया सर्वात वर आहे. ही आहे टाॅप 10 यादी या अहवालात मर्सिडीज बेंज (Mercedes-Benz) चवथ्या स्थानावर, आयबीएम (IBM) पाचव्या स्थानावर, लार्सन अँड टुब्रो (Larsen & Toubro) सहाव्या, नेस्ले (Nestle) सातव्या, इन्फोसिस (Infosys) आठव्या, सॅमसंग (Samsung) नवव्या आणि डेल (Dell)10व्या स्थानावर आहे. गुगल इंडिया लागोपाठ तीन वर्ष अव्वल राहिली होती. म्हणून आता या कंपनीचा हाॅल आॅफ फेममध्ये समावेश केला गेलाय. 'ही' आहे लोकप्रिय काॅलेजेसची कटऑफ लिस्ट, काॅमर्सला जास्त पसंती कर्जबाजारी न होता संपत्ती वाढवायची असेल तर वापरा हा फॉर्म्युला रँडस्टॅड एम्प्लाॅयर ब्रँड रिसर्च  (Randstad Employer Brand Research) जगातल्या 75 टक्के अर्थव्यवस्थेला समोर ठेवूनच केला जातो. यात 32 देशांचा समावेश आहे. दर वर्षी जगभरातल्या 2 लाखाहून अधिक लोकांशी बोलून हे सर्वेक्षण केलं जातं. भारतातही कर्मचाऱ्यांशी बोललं जातं. कंपनी देत असलेला पगार आणि मिळणारे फायदे पाहिले जातात. लोक काम आणि वैयक्तिक आयुष्य याची सांगड योग्य आहे का, नोकरीत सुरक्षा आहे का याकडेही जास्त लक्ष देतात, असं आढळून आलंय. सावधान, मोदी सरकारनं लागू केले इन्कम टॅक्सचे नवे कडक नियम रँडस्टॅड इंडियाचे मुख्य कार्यकारी पाॅल ड्युपुइस म्हणाले, ब्रँडिंग कंपन्या उपयोगी आहेत. त्यांच्या मालकांना कुशल कामगार मिळतात आणि कर्मचाऱ्यांना कळतं की कंपनी त्यांच्या अपेक्षा पूर्ण करेल की नाही ते. या सर्वेक्षणात एक महत्त्वाची गोष्ट समोर आलीय ती म्हणजे 55 टक्के भारतीय नागरिक बहुराष्ट्रीय कंपनींमध्ये काम करणं पसंत करतात. तर 9 टक्के लोक स्टार्टअपमध्ये काम करायचं ठरवतात. 'ही काय पद्धत झाली का?' अजित पवारांचा संताप, मुख्यमंत्र्यांचंही जोरदार उत्तर
  First published: