नवी दिल्ली, 31 जानेवारी: केंद्र सरकार लोकांना एक लाख रुपये जिंकण्याची संधी देत आहे. एप्रिल 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंथली रेडिओ कार्यक्रम 'मन की बात' चा 100 वा भाग प्रसारित करण्यात येईल. 'मन की बात' च्या 100 व्या भागाच्या निमित्ताने, सरकारने लोगो डिझाइन करण्यासाठी अर्ज मागवले आहेत. सर्वोत्कृष्ट लोगो डिझाईन करणाऱ्यांना एक लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल. लोगो डिझाइन करण्याची अखेरची तारीख 1 फेब्रुवारी 2023 आहे. यामुळे तुम्हाला यामध्ये इंस्ट्रेस्ट असेल तर ही संधी गमावू नका.
WhatsApp च्या माध्यमातून चेक करा बँक बॅलेन्स, पण कसं?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'मन की बात' हा कार्यक्रम महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित केला जातो. त्यांचा मॅसेज लोकांपर्यंत पोहोचवणे आणि ते लोकांपर्यंत पोहोचावेत या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यासोबतच ते या कार्यक्रमापूर्वी लोकांचे विचार आणि सल्ले जाणून घेण्याचा आग्रह करतात.
बँकेत वारंवार तक्रार करुनही काम होत नाही? थेट RBI करता येते तक्रार, जाणून घ्या प्रोसेस
तुम्हालाही यात सहभागी व्हायचे असेल, तर त्यासाठी तुम्हाला मन की बातच्या 100 व्या भागाचे चित्रण करणारा आकर्षक लोगो तयार करावा लागेल. 1 लाख रुपये जिंकण्यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील हे आपण जाणून घेऊया...
-लोगो फक्त JPEG, JPG, PNG, SVG फॉरमॅटमध्ये अपलोड करावा लागेल.
-मन की बातचा लोगो डिजीटल प्लॅटफॉर्मवरच डिझाईन केलेला असावा.
-लोगो कलरमध्ये डिझाइन केलेला असावा. लोगोचा आकार पोर्ट्रेट किंवा लँडस्केपमध्ये 5 सेमी * 5 सेमी ते 60 सेमी * 60 सेमी पर्यंत असू शकतो.
-लोगो वेबसाइट किंवा ट्विटर आणि फेसबुकसारख्या सोशल मीडियावर वापरला जाईल. यासह, ते प्रेस रीलिझ, स्टेशनरी आणि साइनेज, लेबल इत्यादींमध्ये देखील वापरण्यास योग्य असावा.
-लोगो किमान 300 dpi सोबत हाय रिझोल्यूशनमध्ये असावा.
- या वेबसाइटवर https://secure.mygov.in/task/design-logo-100th-episode-mann-ki-baat/ जाणून घेऊ शकता डिटेल्स.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mann ki baat, Modi government, Narendra Modi, Pm modi, Pmo