नवी दिल्ली, 25 मे : मणिपूरमध्ये आर्थिक संकट निर्माण झालंय. कारण महिन्याच्या सुरुवातीला येथे हिंसा पसरली होती. राज्याच्या बाहेरून आलेल्या साहित्याच्या निर्यातीवर परिणाम झाल्यामुळे राज्यात अत्यावश्य साहित्याच्या किंमती या दुप्पटीने वाढल्या आहेत. मनिपूरच्या सर्वाधिक परिसरांमध्ये सिलेंडर, पेट्रोल, तांदूळ, बटाटे, कांदा आणि अंड्याच्या किंमती खूप जास्त वाढल्या आहेत.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, इंफाळ वेस्ट डिस्ट्रिक्टच्या एका शाळेतील शिक्षक मांगलेम्बी चानम यांनी सांगितले की, 'पूर्वी 50 किलोची तांदूळ 900 रुपयांना मिळत होती, पण आता ती 1800 रुपयांना मिळतेय. बटाटा आणि कांद्याच्या दरातही 20 ते 30 रुपयांनी वाढ झालीये. राज्याबाहेरून आणलेल्या प्रत्येक वस्तूची किंमत वाढली आहे.
चमन यांनी सांगितले की, काळ्या बाजारात गॅस सिलिंडर 1800 रुपयांना मिळत आहे. तर अनेक भागात पेट्रोलची किंमत 170 रुपये प्रति लीटरपर्यंत पोहोचली आहे. ते म्हणाले, 'अंड्यांची किंमतही वाढली आहे. 30 अंड्यांचा एक क्रेट 180 रुपयांना मिळत होता, मात्र आता 300 रुपयांना मिळतोय.' पुढे बोलताना ते म्हणाले की, जीवनावश्यक वस्तू घेऊन जाणाऱ्या ट्रकवर सुरक्षा दलांनी कडक निगराणी ठेवली आहे, अन्यथा किंमती आणखी वाढू शकल्या असत्या. त्यांनी सांगितले की, सुरक्षा दलाच्या आगमनापूर्वी बटाट्याचे भाव 100 रुपये किलोवर गेले होते.
मणिपूरमधील अनेक भागांमध्ये हिंसा झालेली नाही. अशा ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत फारसा फरक पडलेला नाही. तामेंगलाँग जिल्ह्यात रेशन दुकान चालवणाऱ्या रेबेका गंगमेई म्हणाल्या, 'आवश्यक वस्तूंच्या, विशेषतः तांदळाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. आमच्या जिल्ह्यात तर हिंसाचारही झाला नाही. केवळ मांसाच्या किमतीत कोणताही बदल दिसून आला नाही, कारण ते इतर राज्यांतून आयात केले जात नाही आणि स्थानिक लोकांकडूनच खरेदी केले जाते.'
उखरुल जिल्ह्यातील एका सरकारी कॉलेजमध्ये असिस्टेंट प्रोफेसर पमचुइला काशुंग यांनी सांगितले की, त्यांचा जिल्हा नागालँडच्या जवळ आहे.जिथून माल येतो, त्यामुळे किमती फार वाढलेल्या नाहीत. मात्र, असे असूनही तांदूळ आणि इतर काही वस्तूंच्या किमती झपाट्याने वाढल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
श्रीमंत लोक करतात ही कामं, म्हणून मिळतो पैसा; तुम्हीही जाणून घ्या ही ट्रिक
येथे मैती समाजाने अनुसूचित जमातीचा (एसटी) दर्जा देण्याची मागणी केली होती. याच्या निषेधार्थ 3 मे रोजी इंफाळ खोऱ्यात आदिवासी एकता मोर्चा काढण्यात आला. यानंतर मैती आणि कुकी समुदायांमध्ये हिंसाचार झाला. ज्यामध्ये 70 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. विविध ठिकाणी रास्ता रोको करण्यात आले. ज्यामुळे राज्यातील ट्रकच्या वाहतुकींवर परिणाम झाला आहे. या मोर्चामुळे मणिपूरमध्ये हिंसाचार होऊ शकतो, अशी भीतीही वाहतूकदारांमध्ये होती. त्यामुळे राज्यातील जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होऊ शकला नाही. या हिंसाचारात इंफाळ पश्चिम जिल्हा सर्वाधिक प्रभावित झालाय. परिस्थिती आणखी बिघडल्यानंतर राज्यामध्ये सुमारे 10,000 लष्कर आणि निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आलेय. डिफेंस स्पोक्स पर्सन यांनी म्हटलेय की, सिक्योरिटी फोर्सेस राज्यातील स्थिती पूर्ववत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.
पती-पत्नी दोघांनाही PM किसान योजनेचा लाभ मिळेल? 6 ऐवजी येतील 12 हजार, जाणून घ्या नियम
मणिपूरच्या एकूण लोकसंख्येच्या 53 टक्के मैती समुदाय आहे. या समुदायाचे लोक बहुतेक इम्फाळ खोऱ्यामध्ये राहतात. तर नगा आणि कुकी जमाती मिळून मणिपूरच्या लोकसंख्येच्या 40 टक्के आहेत. हे दोन्ही समुदाय प्रामुख्याने मणिपूरच्या डोंगराळ जिल्ह्यांमध्ये राहतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gas, Manipur, Money18, Petrol, Petrol and diesel, Petrol price hike