मराठी बातम्या /बातम्या /मनी /श्रीमंत लोक करतात ही कामं, म्हणून मिळतो पैसा; तुम्हीही जाणून घ्या ही ट्रिक

श्रीमंत लोक करतात ही कामं, म्हणून मिळतो पैसा; तुम्हीही जाणून घ्या ही ट्रिक

असं करा पैशांच मॅनेजमेंट

असं करा पैशांच मॅनेजमेंट

गुंतवणूक लवकर सुरू करावी. जितक्या लवकर तुम्ही तुमच्या वयानुसार गुंतवणूक करायला सुरुवात कराल तितके चांगले परिणाम दिसून येतील. गुंतवणुकीचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. यापैकी चांगला पर्याय निवडून गुंतवणूक करता येते.

मुंबई, 24 मे : प्रत्येकाला आयुष्यात खूप पैसा कमवायचा असतो आणि पैसा कमवण्यासाठी लोकांना खूप मेहनत करावी लागते. यासोबतच श्रीमंत होण्यासाठी, केवळ कठोर परिश्रमच घ्यावे लागत नाही. तर श्रीमंत लोकही पैसे कमवण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेतात. श्रीमंत लोक या गोष्टी कोणाच्याही नकळत करत असतात. त्यामुळेचे त्यांच्याकडे जास्त पैसा जमा होतो. अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही श्रीमंत व्हायचे असेल तर श्रीमंत लोक फॉलो करत असलेल्या फायनेंशियल टिप्स नक्कीच फॉलो करा.

सुरुवातीपासूनच करा गुंतवणूक

गुंतवणूक लवकर सुरू करावी. जितक्या लवकर तुम्ही तुमच्या वयानुसार गुंतवणूक करायला सुरुवात कराल तितके चांगले परिणाम दिसून येतील. गुंतवणुकीचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. यापैकी चांगला पर्याय निवडून गुंतवणूक करता येते.

फायनेंशियल गोल सेट करा

तुम्हाला तुमच्या पैशाने काय साध्य करायचे आहे? या प्रश्नाचे उत्तर जेव्हा तुमच्या मनात येईल, तेव्हा त्यानुसार तुमचे आर्थिक ध्येय निश्चित करा आणि ते साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल करा.

या बँका RD वर देताय 7 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज, चेक करा इंट्रेस्ट रेट्स

तुमचे उत्पन्न वाढवा

तुमचे उत्पन्न वाढवण्यावर नेहमी लक्ष केंद्रित करा. यासाठी तुम्ही तुमच्या पगारात इन्क्रीमेंट घ्या किंवा काही फ्रीलान्स काम करा किंवा साइड बिझनेस करा. पैसा नेहमी येत राहिला पाहिजे.

FD वर कुठं मिळतंय जास्त व्याज? या बँका देताय जबरदस्त ऑफर

कर्जाच्या सापळ्यात अडकू नका

श्रीमंत होण्याच्या मार्गात कर्ज हा अडथळा म्हणून पाहिला जातो. जर तुमच्याकडे कर्जे असतील तर ती लवकरात लवकर सोडवण्याचा मार्ग शोधा

First published:
top videos

    Tags: Money18