नवी दिल्ली, 25 जून : भारतात पॅन कार्ड (Pan Card) हे आधार कार्डशी (Aadhar Card) लिंक (Link) करण्याची मुदत (Deadline extended) पुन्हा वाढवण्यात आलीय. ही मुदत तीन महिन्यांनी (3 months) वाढवत असल्याची घोषणा अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी केली आहे. आता 30 सप्टेंबरपर्यंत (30th September) भारतीय नागरिक त्यांचं पॅन कार्ड हे आधार कार्डाशी लिंक करू शकतील. यापूर्वीच्या घोषणेनुसार ही मुदत 30 जून रोजी संपणार होती. मात्र त्यापूर्वीच सरकारनं मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
याशिवाय आयकर परताव्याबाबतदेखील काही घोषणा सरकारनं केल्या आहेत. केंद्र सरकारच्या ‘विवाद से विश्वास’ या योजनेअंतर्गत थकीत आयकरावरील व्याज माफ करण्याची मुदतही वाढवण्यात आली आहे. सध्या 30 जूनपर्यंत असणारी यासाठीची मुदत वाढवून ती आता 31 ऑगस्ट करण्यात आली आहे. कोरोना काळात झालेलं लॉकडाऊन, बुडालेले व्यवसाय, गेलेल्या नोकऱ्या आणि इतर आर्थिक संकटांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना त्यांचा आयकर भरण्यासाठी अधिक वेळ मिळावा, या हेतूने थकीत आयकरावर व्याज लावण्याची प्रक्रिया 31 ऑगस्टपर्यंत पुढं ढकलण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.
#WATCH | MoS Finance announces tax concessions for payment towards COVID treatment/death. Amount paid for medical treatment to an employee by an employer or to a person by any person on account of COVID for FY 2019-20 &subsequent yr won't be taxed in hands of employee/beneficiary pic.twitter.com/QmBNhcMgAo
— ANI (@ANI) June 25, 2021
टीडीएस स्टेटमेंट जमा करण्याची मुदत 15 दिवसांनी वाढवण्यात आली आहे. अगोदर ही मुदत 30 जून होती. ती आता 15 जुलै करण्यात आली आहे. तर टॅक्स डिडक्शन सर्टिफिकेटसाठीची मुदतही 31 जुलैपर्यंत वाढवण्याची घोषणा अर्थ राज्यमंत्र्यांनी केली आहे. रजिस्ट्रेशन ऑफ इन्स्टिट्यूशन्सची अंतिम मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. तर सेटलमेंट कमिशनकडे दाखल केलेलं प्रकरण मागे घेण्यासाठीची मुदतही 31 जुलैपर्यंत वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
हे वाचा - पाच तासांनंतर कर्मचाऱ्यांना कामामध्ये ब्रेक आवश्यक- मोदी सरकार बदलणार नियम?
मदतीवर टॅक्स माफ
एखाद्या संस्थेनं त्यांच्या कर्मचाऱ्यांना कोरोनावरील उपचारासाठी आर्थिक मदत केली असेल, तर त्या रकमेवरचा कर माफ करण्यात येणार आहे. तसेच एखाद्या करदात्याने दुसऱ्या करदात्याला कोरोनावरील उपचार किंवा संबंधित कारणांसाठी काही पैसे दिले असतील, तर त्या रकमेवरील करदेखील माफ करण्यात येईल, अशी घोषणा केंद्र सरकारनं केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aadhar card link, Income tax, Pan card