मुंबई, 20 जून : सर्वसामान्यांसाठी पोस्ट ऑफिस सेव्हिंग्जचे बरेच पर्याय देत असतं. इथे पब्लिक प्राॅव्हिडंट फंड (PPF) ते 9 प्रकारच्या स्माॅल सेव्हिंग स्कीम आहेत. या गुंतवणूक योजना सरकार तर्फे प्रायोजित असतात. यापैकी दोन अशा योजना आहेत ज्याचा दर 8 टक्क्यांहून जास्त आहे. यात गुंतवणूक केली तर जास्त फायदा मिळू शकतो. ज्येष्ठ नागरिक बचत योजना सीनियर सिटिझन सेव्हिंग स्कीम वरिष्ठ नागरिकांसाठी आहे. या स्कीममध्ये बँक फिक्स्ड डिपाॅझिटपेक्षा जास्त व्याज मिळतं. वरिष्ठ नागरिकांसाठीची पोस्ट ऑफिसची ही स्कीम सर्वात सुरक्षित गुंतवणूक आहे. यात तुम्ही 5 वर्षांकरता गुंतवणूक करू शकता. मॅच्युरिटीनंतर या योजनेला 3 वर्षांसाठी आणखी वाढवता येते. या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त 15 लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. दर महिन्याला 2 लाख रुपये कमवण्याचा हिट फाॅर्म्युला, ‘असा’ सुरू करा व्यवसाय वर्षाला 8.7 टक्के व्याज दर ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत गुंतवणूक केलेल्या पैशांवर तुम्हाला 8.7 टक्के व्याज मिळवता येईल. या व्याजावर टॅक्स द्यावा लागतो. या योजनेअंतर्गत गुंतवणूक केल्यावर 1 एप्रिल 2007 पासून इन्कम टॅक्स अॅक्ट 1961 (Income Tax Act, 1961) च्या सेक्शन 80C प्रमाणे कर सवलत मिळते. यात्रा मंगलमय हो ! आता दिल्ली-मुंबई रेल्वेचा प्रवास फक्त 10 तासांत कधी उघडता येतं खातं? ज्येष्ठ नागरिक निवृत्तीनंतर SCSS खातं उघडू शकतात. 60पेक्षा जास्त वयाचे नागरिक अकाउंट उघडू शकतात. VRS घेतलेला व्यक्ती 55 वर्षानंतर अकाउंट सुरू करू शकतो. या अकाउंटचा मॅच्युरिटी पीरियड 5 वर्षांचा आहे. कॅश किंवा चेकद्वारे तुम्ही अकाउंट सुरू करू शकता. 1 लाखापेक्षा जास्त रक्कम असेल तर चेक द्यावा लागेल. खुशखबर! येत्या 48 तासांत राज्यात मान्सून दाखल होणार, हवामान विभागाचा अंदाज सुकन्या समृद्धी योजना कोणीही व्यक्ती आपल्या 10 वर्षापर्यंतच्या मुलींच्या नावे अकाउंट उघडू शकतो. यात 14 वर्षच गुंतवणूक करता येते. तुम्ही तुमच्या 1 वर्षांच्या मुलीच्या नावे खातं उघडलंत तर तिच्या 15व्या वर्षापर्यंत गुंतवणूक करू शकता. यात तुम्ही 15 वर्ष ते 21 वर्षांमध्ये या अकाउंटमध्ये कसलीही गुंतवणूक न करता व्याज मिळवू शकता. या खात्यात जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये एका वर्षासाठी गुंतवू शकता. 14 वर्षानंतर तुम्हाला मिळतील 40 लाख रुपये. त्यानंतर तुम्ही ते पैसे काढले नाहीत तर मुलगी 21 वर्षांची झाल्यावर 64.8 लाख रुपये मिळतील. 8.5 टक्के व्याज द यात वर्षाला 8.5 टक्के व्याज मिळतं. सेक्शन 80C प्रमाणे कर सवलतही मिळू शकते. सुकन्या योजनेअंतर्गत तुम्ही जवळच्या पोस्ट आॅफिसमध्ये जा आणि तिथे सुकन्या समृद्धी योजनेचा फाॅर्म घ्या. इंटरनेटवरही इंडिया पोस्टच्या वेबसाइटवरून तुम्ही फाॅर्म डाऊनलोड करू शकता. मुलीचा फोटो त्यावर लावून फाॅर्म भरून पोस्ट आॅफिसमध्ये द्या. फाॅर्म भरून त्यावर योग्य सही करा. तुमचा आयडी आणि घरच्या पत्त्याचं प्रूफ यांचे झेराॅक्स जोडा. आधारकार्ड असेल तर ते जोडा. मुलीचं बर्थ सर्टिफिकेट, तुमचे आणि मुलीचे पासपोर्ट साइज फोटो जोडा. तुम्ही सुकन्या समृद्धी योजना खातं बँकेत सुरू करू शकता. VIDEO: विधानसभेत पाण्याच्या मुद्द्यावरून तुफान राडा, विरोधकांचा आक्रमक पवित्रा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







