मुंबई, 20 जून : अक्षय तृतीयेनंतर सोन्याच्या भावात सातत्यानं वाढ होतेय. आज ( 20 जून ) सोन्याच्या भावानं आंतरराष्ट्रीय बाजारात उच्चांक गाठलाय. सोनं 39 डाॅलर्स प्रति औंस झालं आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 1387 प्रति औंस झालाय. अमेरिकेनं व्याजदरात कपात केलीय. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्यामध्ये गुंतवणूक करणं पसंत केलं. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्यानं उच्चांक गाठलाय. याचा परिणाम भारतीय बाजारपेठेवरही झाला.एससीएक्सवर प्रति 10 ग्रॅम सोन्याचा भाव 797 रुपयांनी वधारून 33,876 रुपये झाला. चांदीचा भाव प्रति किलो 843 रुपयांनी वधारून 38,147 रुपये झाला. EPFO मध्ये नोकरीची मोठी संधी, ‘असा’ करा अर्ज अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्याच्या किमती कमी झाल्या होत्या. आॅल इंडिया सराफा असोसिएशनच्या माहितीप्रमाणे सोन्याची किंमत 50 रुपयांनी कमी होऊन 32,670 रुपये प्रति ग्रॅम झाल्या होत्या. तर चांदी 10 रुपयांनी कमी होऊन 38,120 रुपये प्रति किलोग्रॅम झाली होती. दर महिन्याला मिळेल 12,500 रुपयांची स्काॅलरशिप, मोदी सरकारची योजना दिल्ली सराफा बाजारात 99.9 टक्के आणि 99.5 टक्के शुद्ध सोनं 50-50 रुपयांनी कमी झालं होतं. ते 32,670 रुपये आणि 32,500 रुपये प्रति 10 ग्रॅम मिळत होतं. पण अक्षय तृतीयेनंतर त्यात वाढ सुरू झाली. अगोदर व्यापाऱ्यांनी सांगितलं की, घरगुती पातळीवर सोन्याची मागणी कमी झाली म्हणून किमती कोसळल्या होत्या. त्याचबरोबर अमेरिकन अर्थव्यवस्थेत आलेल्या मजबुतीमुळे गुंतवणूकदार सोन्याऐवजी शेअर बाजारात गुंतवणूक करतात. म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भाव कमी झाले होते. बजेटमध्ये नोकरदारांना मिळू शकतो मोठा दिलासा अमेरिका-चीन यांच्या ट्रेड युद्धामुळे शेअर मार्केट कोसळत होतं. त्यामुळे अनेक जणांनी पुन्हा सोन्यात गुंतवणूक करणं सुरू केलं. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव वधारला. राष्ट्रपतींच्या भाषणादरम्यान राहुल गांधी मोबाईलमध्ये व्यस्त, VIDEO व्हायरल
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







