मराठी बातम्या /बातम्या /मनी /

शेअर बाजाराचा खेळ; काही क्षणात झाले अब्जाधीश अन् तीन दिवसांनी कंगाल

शेअर बाजाराचा खेळ; काही क्षणात झाले अब्जाधीश अन् तीन दिवसांनी कंगाल

शेअर बाजारात नेहमी अनिश्चततेचा खेळ पाहायला मिळतो. त्यामुळे स्वत:च्या जोखमीवर या ठिकाणी गुंतवणूक करायला हवी, असा सल्ला जाणकार देतात.

शेअर बाजारात नेहमी अनिश्चततेचा खेळ पाहायला मिळतो. त्यामुळे स्वत:च्या जोखमीवर या ठिकाणी गुंतवणूक करायला हवी, असा सल्ला जाणकार देतात.

शेअर बाजारात नेहमी अनिश्चततेचा खेळ पाहायला मिळतो. त्यामुळे स्वत:च्या जोखमीवर या ठिकाणी गुंतवणूक करायला हवी, असा सल्ला जाणकार देतात.

  मुंबई, 11 ऑगस्ट :  नशीब पालटायला वेळ लागत नाही, असं नेहमी म्हटलं जातं. एका रात्रीत रंकाचा राव आणि रावाचा रंक होऊ शकतो. विशेषत: शेअर बाजारात असा प्रकार अनेकदा पाहायला मिळतो. याचाच अनुभव एका इन्व्हेस्टमेंट बँकेच्या (Investment Bank) दोन संस्थापकांना (Founders) आला. कंपनीच्या शेअर्समध्ये अचानक आलेल्या तेजीने संचालक एका रात्रीत अब्जाधीश (Billionaires) झाले; पण घसरण झाल्यानंतर तीन दिवसांतच ते पुन्हा कंगाल झाले. अब्जाधीश होण्याची सुरुवात त्यांनी जिथून केली तिथेच ते पोहोचले. या संदर्भातलं वृत्त ‘आज तक’ने दिलं आहे. शेअर बाजारात नेहमी अनिश्चततेचा खेळ पाहायला मिळतो. त्यामुळे स्वत:च्या जोखमीवर या ठिकाणी गुंतवणूक करायला हवी, असा सल्ला जाणकार देतात. कधी कधी त्याचा अपेक्षेपेक्षा अधिक फायदाही होऊ शकतो. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, हाँगकाँग (Hongkong) येथील मॅजिक एम्पायर ग्लोबल लिमिटेड (Magic Empire Global Ltd) ही कंपनी अंडररायटिंग आणि अ‍ॅडव्हायझरी सेवा (Underwriting & Advisory Services) पुरवण्याचं काम करते. कंपनीने त्यांचा आयपीओ (IPO-Initial Public Offering) आणला होता. मागील आठवड्यात शुक्रवारी कंपनीचे शेअर्स अमेरिकन शेअर बाजारात (Share Market) लिस्ट झाले. सोमवारी कंपनीच्या शेअर्सनी (Stocks) अचानक जोरदार उसळी घेतली आणि कंपनीचे दोन्ही संचालक अब्जाधीश झाले. करदात्यांना मोठा झटका, सरकारने अटल पेन्शन योजनेत केले बदल
  कंपनीचे शेअर्स लिस्ट (Share Listing) झाल्यानंतर लिस्टिंग प्राइसच्या (Listing Price) तुलनेत त्यांचा भाव 6,149 टक्क्यांपर्यंत वाढला. शेअर्सनी उसळी घेतल्यानंतर कंपनीचं बाजारमूल्यही (Market Cap) 5 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचलं. एखाद्या कंपनीच्या बाबतीत असा चमत्कार घडल्यानंतर त्याचा आनंद साजरा होणं साहजिकच होतं. कंपनीचे प्रमुख भागीदार यासाठी तयारीतही होते. परंतु, अब्जाधीश होण्याचा जल्लोष साजरा करण्याआधीच सर्वांना मोठा धक्का सहन करावा लागला आणि शेअर्स गडगडले.
  मॅजिक एम्पायर कंपनीमध्ये गिल्बर्ट चॅन आणि जॉन्सन चॅन (Gilbert Chan & Jhonson Chan) यांची 63 टक्क्यांची भागीदारी होती. कंपनीच्या शेअर्सनी उसळी घेतल्यानंतर दोघांच्या शेअर्सची किंमत वाढून अनुक्रमे 1.8 अब्ज डॉलर्स आणि 1.3 अब्ज डॉलर्सवर पोहोचली. मंगळवारी मात्र कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत 89 टक्के घसरण नोंदवली गेली. जोरदार धक्का बसल्याने प्रवास उलट दिशेने झाला. शेअर्समध्ये घसरण झाल्याने गिल्बर्ट चॅन यांच्या शेअर्सचं मूल्य घटून जवळपास 9 कोटी डॉलर्सवर आलं आहे. जॉन्सन यांच्या शेअर्सचं मूल्य 6.5 कोटी डॉलर्सवर पोहोचलं आहे. दोघेही फक्त तीन दिवसांसाठीच अब्जाधीश होऊ शकले. 2016 मध्ये सुरू झालेल्या मॅजिक एम्पायर कंपनीत मागील वर्षी केवळ 9 कर्मचारी काम करत होते. 2021 मध्ये कंपनीचा
  First published:

  Tags: Money, Share market

  पुढील बातम्या