फोटोग्राफीसाठी बाजारात एकापेक्षा एक मोबाईल आले आहेत. तुम्हाला फोटोग्राफीची आवड असेल आणि कोणता मोबाइल घ्यायचा हे ठरवता येत नसेल, तर बाजारात उपलब्ध असलेल्या काही उत्तम स्मार्टफोन्सची माहिती देत आहोत. हे स्मार्टफोन स्वस्त तर आहेतच शिवाय अप्रतिम कॅमेऱ्यांनी सुसज्ज आहेत.
Realme Narzo 50A- फोटोग्राफीसाठी Realme Narzo 50A हा चांगला स्मार्टफोन आहे. हा स्मार्टफोन 50-मेगापिक्सलच्या प्रायमरी कॅमेराने सुसज्ज आहे. यासोबतच चांगल्या पोट्रेटसाठी 2 मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर आणि 2 मेगापिक्सेलचा मोनोक्रोम कॅमेरा आहे. समोर HDR सह 8-मेगापिक्सेल AI सेल्फी कॅमेरा मिळेल. हा स्मार्टफोन ऑनलाईन 12,499 रुपयांना उपलब्ध आहे.
Redmi Note 10 Lite- या फोनमध्ये 48-मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, एक 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि दोन 2-मेगापिक्सल सुपर-मायक्रो आणि पोर्ट्रेट कॅमेरे आहेत. कॅमेरा सॉफ्टवेअरच्या बाबतीत, तुमच्याकडे नाईट मोड, प्रो कलर आणि प्रो व्हिडिओ मोड आहेत. सेल्फी क्लिक करण्यासाठी 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. आहे. हा फोन 14,999 रुपयांना ऑनलाईन उपलब्ध आहे.
Samsung Galaxy M21 2021 Edition- सॅमसंगचा Galaxy M21 2021 तरुण वर्गाला लक्षात घेऊन बनवण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 48-मेगापिक्सेल प्रायमरी, 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड आणि 5-मेगापिक्सेल डेप्थ कॅमेरा कॉन्फिगरेशनसह ट्रिपल कॅमेरा सेटअपसह येतो. हा फोन 11,499 रुपयांना उपलब्ध आहे.
Redmi Note 10S- हा फोटोग्राफीसाठी आणखी एक बजेट फोन आहे. या स्मार्टफोनमध्ये, तुम्हाला क्वाड-कॅमेरा मिळेल ज्यामध्ये 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड, 2-मेगापिक्सेल टेली-मॅक्रो आणि 2-मेगापिक्सेल पोर्ट्रेट सेन्सरसह 64-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा आहे. सेल्फीसाठी 13-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. फोन 12,499 रुपयांना उपलब्ध आहे.
Oppo A55- हा ट्रिपल कॅमेरा सेटअप असलेला एक चांगला स्मार्टफोन आहे ज्यामध्ये 50-मेगापिक्सेल प्राथमिक, 2-मेगापिक्सेल मोनोक्रोम आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो कॅमेरा समाविष्ट आहे. समोर, तुम्हाला सेल्फी साठी 16-मेगापिक्सेल कॅमेरा मिळेल. हा स्मार्टफोन 14,999 रुपयांना ऑनलाइन उपलब्ध आहे.