मुंबई, 11 ऑगस्ट : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो रेटमध्ये वाढ केल्यानंतर बँकांनी त्यांची कर्जाचे व्याजदर वाढवण्यासा सुरुवात केली आहे. मात्र दुसरीकडे बँकांनी फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजदरही वाढवण्यास सुरु केली आहे. त्यामुळे ग्राहकांना वाढीव व्याजाचा फायदा मिळणार आहे. कोटक महिंद्रा आणि येस बँकेने आपल्या एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. कोटक महिंद्रा बँकेने आपल्या 2 कोटींपेक्षा कमी ठेव योजनेवरील व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. बँक 7 ते 10 वर्षांच्या FD वर 2.50 टक्के ते 5.90 टक्के व्याजदर देत आहे. हे नवीन दर 10 ऑगस्ट 2022 पासून लागू झाले आहेत. तर येस बँकेने देखील आपल्या 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बँक आपल्या ग्राहकांना 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या FD वर 3.25 टक्के ते 6.75 टक्के व्याजदर देत आहे. हे नवीन दर कालपासून म्हणजेच 10 ऑगस्ट 2022 पासून लागू झाले आहेत. Post Office ची खास योजना, बँकेपेक्षा जास्त आणि पैसेही सुरक्षित; किती महिन्यात होतील पैसे दुप्पट?
कोटक महिंद्रा बँक एफडी दर
7-14 दिवस- 2.50% 15-30 दिवस- 2.65% 31-45 दिवस- 3.25% 46-90 दिवस- 3.25% 91-120 दिवस- 3.75% 121-179 दिवस- 3.75% 180 दिवस - 5.00% 181-269 दिवस - 5.00% 270 दिवस - 5.00% 271-363 दिवस - 5.00% 364 दिवस-5.25% 365-389 दिवस-5.75% 391 दिवस ते 23 महिने - 5.85% 23 महिने- 5.85% 23 महिने ते 2 वर्षे - 5.85% 2 वर्षे ते 3 वर्षे - 5.85% 3 वर्षे ते 4 वर्षे - 5.90% 4 वर्षे ते 5 वर्षे - 5.90% 5 वर्षे ते 10 वर्षे - 5.90% पुण्याच्या रुपी बँकेचा परवाना रद्द, रिझर्व्ह बँकेचा सर्वात मोठा झटका, गाशा गुंडाळण्याचे आदेश येस बँकेचे एफडी दर 7 ते 14 दिवसांची FD - 3.25% 15 ते 45 दिवसांची FD - 3.70% 46 ते 90 दिवसांची FD - 4.10% 3 ते 6 महिने - 4.75% 6 ते 9 महिने - 5.50% 9 ते 12 महिने - 5.75% 1 ते 18 महिने - 6.25% 18 महिने ते 3 वर्षे - 6.75% 3 ते 10 वर्षे - 6.75%