Home /News /money /

mAadhaar App: कुटुंबातील सर्वांचं आधार कार्ड प्रोफाईल एकाच ठिकाणी करा सेव्ह; चेक करा संपूर्ण प्रोसेस

mAadhaar App: कुटुंबातील सर्वांचं आधार कार्ड प्रोफाईल एकाच ठिकाणी करा सेव्ह; चेक करा संपूर्ण प्रोसेस

Aadhar card

Aadhar card

तुम्हाला आधार कार्ड हरवण्याचा त्रास टाळायचा असेल तर mAadhaar अॅप आधार कार्डचे प्रोफाईल स्टोअर करू शकते. UIDAI ने 2017 मध्ये हे अॅप लाँच केले. UIDAI ने सांगितले आहे की mAadhaar अॅपच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे आधार प्रोफाइल एकाच ठिकाणी सहजपणे स्टॉक करू शकता.

पुढे वाचा ...
    मुंबई, 14 मे : आधार कार्ड (Aadhaar Card) हे आजच्या काळातील सर्वात महत्त्वाचे कागदपत्र (Important Documents) आहे. सर्व नागरिकांची बायोमेट्रिक माहिती (Biometric Information) आधार कार्डमध्ये नोंदवली जाते. आधार कार्ड बनवताना, आपल्याला आपल्या बोटांचे ठसे आणि डोळ्यांची रेटिना देखील स्कॅन करावी लागेल. प्रवासापासून ते मुलांच्या शाळा कॉलेजमध्ये प्रवेश, सरकारी योजनांचा लाभ घेणे, बँक खाते उघडणे, मालमत्ता खरेदी करण्यापर्यंत सर्वत्र आधार कार्ड आवश्यक आहे. आधार कार्डच्या वाढत्या उपयुक्ततेमुळे ते सुरक्षित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. FD मधील पैसेही होणार कमी! महागाई तुमच्या खिशावर कशी मारतेय डल्ला? घरचं बजेट आता नव्याने करावं लागणार mAadhaar अॅपमध्ये 5 प्रोफाइल जोडा अनेकवेळा आधारकार्ड सतत जवळ बाळगल्याने हरवण्याची शक्यता असते. जर तुम्हाला आधार कार्ड हरवण्याचा त्रास टाळायचा असेल तर mAadhaar अॅप आधार कार्डचे प्रोफाईल स्टोअर करू शकते. UIDAI ने 2017 मध्ये हे अॅप लाँच केले. UIDAI ने सांगितले आहे की mAadhaar अॅपच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे आधार प्रोफाइल एकाच ठिकाणी सहजपणे स्टॉक करू शकता. यामध्ये तुम्ही 5 प्रोफाइल जोडू शकता. या अॅपमुळे तुमचे आधार कार्ड गहाळ होण्याची भीती राहणार नाही. mAadhaar अॅपमध्ये प्रोफाइल कसे अॅड करायचे ते समजून घेऊयात. IPL प्रसारण हक्क खरेदी करण्याच्या शर्यतीमध्ये Google ची एन्ट्री! अशा प्रकारे mAadhaar अॅपमध्ये प्रोफाइल जोडा? >> सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवर mAadhaar अॅप डाउनलोड करा. >> यानंतर तुम्ही तुमचा 12 अंकी आधार क्रमांक या अॅपमध्ये भरा. >> मागितलेली सर्व माहिती एंटर करा. >> तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP येईल, तो टाका. >> यानंतर अॅप तुमचे प्रोफाइल अॅड करेल. >> अशा प्रकारे तुम्ही 5 आधार प्रोफाइल सहज जोडू शकता.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Aadhar card, Central government, Money, UIDAI

    पुढील बातम्या