नवी दिल्ली, 30 जानेवारी : महागाईमुळे त्रासलेल्या सर्वसामान्यांच्या खिशाला येत्या वर्षभरात आणखी चाप बसण्याची शक्यता आहे. जीवनावश्यक वस्तुंच्या किमतीत भरमसाठ वाढ होत आहे. नवीन वर्षाचा पहिला महिना संपतोय तोपर्यंतच अशी बातमी समोर समोर येत आहे की, या वर्षभरात स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची किंमतही वाढण्याची शक्यता आहे. ग्राहकांना सध्याच्या गॅस सिलिंडरच्या दरापेक्षा साधारण 100 ते 150 रुपये अधिक मोजावे लागणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचं बजेट कोसळण्याची शक्यता आहे. जुलै 2019 ते जानेवारी 2020 या कालावधीमध्ये घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत सरासरी 10 रुपयांची वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही तेलाच्या किमती कमी झाल्या आहेत. तेल कंपन्यांना देण्यात येणारं अनुदान कमी करण्याचा सरकारचा मानस आहे. असं असलं तरीही सध्या होणाऱ्या दरवाढीचा फायद्या तेल कंपन्याना होत आहे, सामान्य नागरिकांच्या खिशाला मात्र भुरदंड आहे. जुलै 2019 ते जानेवारी 2020 या कालावधील एलपीजी सिलिंडरच्या किमतीत साधारण 63 रुपयांची वाढ तेल कंपन्यांकडून करण्यात आली. म्हणजेच जर 10 रुपये प्रतिमहा दराने एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ होत राहिली तर पुढील 15 महिन्यांनंतर तेल कंपन्यांना केंद्राचं सहकार्य आवश्यक नसेल. (हेही वाचा : लाखो कर्मचाऱ्यांची EPF खाती ब्लॉक, यात तुमचं खातं तर नाही ना? ) अनुदानित एलपीजी सिलिंडरची किंमत सध्या जवळपास 557रुपये आहे. त्यातही सरकार पात्र ग्राहकांच्या खात्यात अनुदान म्हणून 157 रुपये जमा करतं. कच्च्या तेलाच्या किमतीत सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात घट होत आहे. या कच्च्या तेलाची किंमत 60 डॉलर प्रति बॅरेल राहिल्यास सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाची रक्कम घटण्याची शक्यता आहे. (हेही वाचा : सोन्याला पुन्हा झळाळी, लग्नसराईच्या काळात सोन्याच्या दरात वाढ )
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.