मराठी बातम्या /बातम्या /मनी /

LPG Price: 809 रुपयांचा एलपीजी गॅस सिलेंडर फक्त 9 रुपयात! कशी मिळवायची ही भारी ऑफर?

LPG Price: 809 रुपयांचा एलपीजी गॅस सिलेंडर फक्त 9 रुपयात! कशी मिळवायची ही भारी ऑफर?

सिलेंडर चक्क 9 रुपयात घेण्याची संधी ग्राहकांना उपलब्ध झाली आहे. पेटीएमनं (Paytm) आपल्या ग्राहकांसाठी ही खास ऑफर आणली आहे.

सिलेंडर चक्क 9 रुपयात घेण्याची संधी ग्राहकांना उपलब्ध झाली आहे. पेटीएमनं (Paytm) आपल्या ग्राहकांसाठी ही खास ऑफर आणली आहे.

सिलेंडर चक्क 9 रुपयात घेण्याची संधी ग्राहकांना उपलब्ध झाली आहे. पेटीएमनं (Paytm) आपल्या ग्राहकांसाठी ही खास ऑफर आणली आहे.

नवी दिल्ली, 2 एप्रिल : दर महिन्याला बदलणाऱ्या घरगुती गॅस सिलेंडरच्या (LPG Gas Cylinder) किंमती सर्वसामान्यांच्या चिंतेत भर टाकत असतात. सध्या गॅस सिलेंडरची किंमत साधारण 800 रुपयांच्या आसपास आहे. मात्र हा सिलेंडर चक्क 9 रुपयात घेण्याची संधी ग्राहकांना उपलब्ध झाली आहे. पेटीएमनं (Paytm) आपल्या ग्राहकांसाठी ही खास ऑफर आणली आहे. 1 एप्रिलपासून एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत 10 रुपयांनी कमी करण्यात आल्यानं दिल्लीत (Delhi) विना अनुदानित 14.2 किलो एलपीजी गॅस सिलेंडर 809 रुपयांना मिळत आहे. तर PayTm ने त्यावर cashback ऑफर देऊ केली आहे.

काय आहे ही ऑफर?

पेटीएमने ही बम्पर कॅशबॅक ऑफर (Bumper Cashback Offer) सुरू केली असून, या अंतर्गत एखाद्या ग्राहकानं गॅस सिलेंडर बुक केल्यास त्याला पेटीएमद्वारे 800 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकेल. म्हणजे सिलेंडर चक्क 9 रुपयात मिळणार आहे. ही ऑफर 30 एप्रिल 2021 पर्यंत असून, संपूर्ण एप्रिल महिना ग्राहकांना स्वस्त एलपीजी खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

जागतिक खूशखबर! पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी होणार; अमेरिकेच्या दबावाचा फायदा

या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे Paytm App नसेल तर ते आधी आपल्या मोबाइल फोनमध्ये पेटीएम अॅप डाउनलोड करावं लागेल. यानंतर आपल्या गॅस एजन्सीमार्फत सिलेंडर बुकिंग करावे लागेल. त्यासाठी पेटीएम अ‍ॅपवर रिचार्ज आणि पे बिलवर (Recharge and Pay Bills) क्लिक करा. त्यानंतर सिलेंडर बुक करण्याचा पर्याय दिसेल. आपली गॅस एजन्सी निवडा आणि FIRSTLPG हा प्रोमो कोड टाकून बुकिंग प्रक्रिया पूर्ण करा.

आता कार्ड नसलं तरी ATM मशीनमधून काढता येणार पैसे! काय आहे Process पाहा

बुकिंगच्या 24 तासांच्या आत तुम्हाला कॅशबॅक स्क्रॅच कार्ड मिळेल. हे स्क्रॅच कार्ड 7 दिवसांच्या आत वापरावं लागेल.

विनामूल्य एलपीजी कनेक्शनचे नियम बदलण्याची शक्यता :

ग्रामीण भागातील महिलांची चुलीच्या धुरापासून होणाऱ्या त्रासातून सुटका व्हावी आणि जळणासाठी होणाऱ्या वृक्षतोडीमुळं पर्यावरणाला निर्माण होणारा धोका कमी व्हावा या उद्देशानं केंद्रसरकारनं घराघरात एलपीजी गॅस कनेक्शन देण्याची योजना राबवली आहे. पेट्रोलियम मंत्रालय या उज्ज्वला योजनेंतर्गत (Ujjwala scheme) दारिद्र्य रेषेखालील लोकांना (BPL) विनामूल्य एलपीजी कनेक्शन देते.

दिलासा! आधार-पॅन लिंक करण्याची मुदत वाढवली; पाहा काय आहे शेवटची तारीख

आतापर्यंत कोट्यवधी घरात गॅस पोहोचला असून, केंद्र सरकारनं यंदाच्या अर्थसंकल्पात 1 कोटी नवीन गॅस कनेक्शनची घोषणा केली होती. आता तेल कंपन्यांना (OMC) देण्यात येणाऱ्या आगाऊ निधी पद्धतीत बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळं ग्राहकांना देण्यात येणाऱ्या अनुदानाची पद्धतही बदलण्यात येणार आहे. पेट्रोलियम मंत्रालय सध्या दोन नवीन पद्धतींवर काम करीत आहे.

First published:

Tags: LPG Price, Paytm