मराठी बातम्या /बातम्या /मनी /जागतिक खूशखबर! पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी होणार; अमेरिकेच्या दबावाचा फायदा

जागतिक खूशखबर! पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी होणार; अमेरिकेच्या दबावाचा फायदा

Petrol Diesel Price: अमेरिकेच्या दबावानंतर OPEC+ देशांनी तेल उत्पादन वाढण्यास होकार दिला आहे. त्याचा आपल्याला कधी आणि कसा फायदा मिळेल?

Petrol Diesel Price: अमेरिकेच्या दबावानंतर OPEC+ देशांनी तेल उत्पादन वाढण्यास होकार दिला आहे. त्याचा आपल्याला कधी आणि कसा फायदा मिळेल?

Petrol Diesel Price: अमेरिकेच्या दबावानंतर OPEC+ देशांनी तेल उत्पादन वाढण्यास होकार दिला आहे. त्याचा आपल्याला कधी आणि कसा फायदा मिळेल?

नवी दिल्ली, 2 एप्रिल: गेल्या काही दिवसांपासून देशात इंधनाच्या किंमती वाढत असल्याने राजकारण चांगलंच तापलं आहे. त्यातच OPEC+ देशांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे भविष्यात पेट्रोलचे (Petrol price in India) दर शंभरी पार करतील असा अंदाज होता. मात्र आता अमेरिकेच्या दबावानंतर OPEC+ देशांनी तेल उत्पादन वाढण्यास होकार दिला आहे. मे महिन्यापासून उत्पादन वाढ होणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात इंधनाच्या किंमती (latest Fuel price) कमी होण्यास मदत होणार आहे.

अमेरिका (United state of America) आणि भारत (India) तेलाच्या वाढत्या किंमतीबाबत वारंवार OPEC+ देशांना विनंती करत होते. मात्र OPEC+ देश या विनंतीकडे कानाडोळा करत होते. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान (Petrolium Minister Dharmendra Pradhan) यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे इंधनाचे दर गगनाला भिडत चालले होते आणि देशातील राजकारणही चांगलेच तापले होते.

तेलाच्या वाढत्या किंमतींबाबत अमेरिकेने चिंता व्यक्त केली होती. त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (President Joe Biden) यांनी सौदी अरबशी यावर पुन्हा एकदा विचार करण्यास सांगितले होते. त्यावर आता OPEC+ देशांनी कच्चा तेलाचं उत्पादन वाढवण्यास होकार दिला आहे.

अमेरिकेकडून इम्रान खानला मोठा झटका, जॉन केरी भारतात येणार मात्र पाकिस्तानात जाण्यास नकार

कोरोनाच्या प्रकोपामुळे मागच्या वर्षी तेलाच्या किंमती प्रचंड घसरल्या होत्या.  तेव्हा OPEC+ देशांनी उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या डिसेंबरमध्ये या संघटनेने त्यांच्या उत्पादनात जवळपास 50 हजार बॅरेलच्या अतिरिक्त उत्पादनाची वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी सौदी अरबने आपल्या कच्च्या तेलाच्या उत्पादनात दहा लाख बॅरेलची कपात केली होती.

सर्वाधिक तेल आयात करणाऱ्या देशांमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतापेक्षा चीन आणि जपान हे दोन देश इंधन आयात करतात. भारत आपल्या गरजेच्या 80 टक्के तेल आयात करतो.

OPEC+ ही तेल उत्पादक देशांची संघटना आहे. या संघटनेत इराक (Iraq), कुवैत (Kuwait), सौदी अरब (Saudi Arab), व्हेनेज्युएला (Venenjula), अझरबॅझान (Azarbazan), बहरीन (Bahrin), ब्रुनेई (Brunei), कझाकिस्तान (Kazakistan), मलेशिया (Malesia), मॅक्सिको(Mexico), ओमान (Oman), रशिया (Russia), दक्षिण सूडान (South Sudan) आणि सूडान (Sudan) या देशांचा सहभाग आहे.

First published:
top videos

    Tags: India, United States of America