मराठी बातम्या /बातम्या /मनी /LPG गॅस बुकिंगबाबतचे नियम बदलणार, सिलेंडर रिफिल करणं होईल अधिक सोपं

LPG गॅस बुकिंगबाबतचे नियम बदलणार, सिलेंडर रिफिल करणं होईल अधिक सोपं

LPG Gas Cylinder Booking: सध्या ग्राहकांकडे जर इंडेनचा गॅस सिलेंडर असेल तर तो इंडेन गॅस एजन्सीच्या माध्यमातून रिफिल केला जाऊ शकतो. आता सरकार आणि कंपन्या असा विचार करत आहेत की LPG गॅसचं बुकिंग आणि रिफिलची प्रक्रिया कशाप्रकारे वेगवान केली जाईल.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 28 मे: आज बहुतांश घरात एलपीजी गॅस सिलेंडरचा (LPG Gas Cylinder) वापर केला जातो. अशावेळी सिलेंडर संपण्यापूर्वी नवा गॅस सिलेंडर बुक केल्यास त्यानंतर तुमची होणारी तारांबळ कमी केली जाऊ शकते. दरम्यान काहीवेळी ही बुकिंगची (LPG Gas Booking) पद्धती किचकट असल्याने उशिर होतो. तुम्ही देखील या समस्येने त्रस्त असल्यास ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सरकार आता LPG सिलेंडरच्या बुकिंगच्या नियमात बदल करण्याचा विचार करत आहे.

सध्या ग्राहकांकडे जर इंडेनचा गॅस सिलेंडर असेल तर तो इंडेन गॅस एजन्सीच्या माध्यमातून रिफिल केला जाऊ शकतो. आता सरकार आणि कंपन्या असा विचार करत आहेत की LPG गॅसचं बुकिंग आणि रिफिलची प्रक्रिया कशाप्रकारे वेगवान केली जाईल. याआधी सरकारने बुकिंगच्या प्रक्रियेत काहीसा बदल केला होता. त्यावेळी सरकारने नियम बदलत बुकिंग ओटीपी बेस्ड बनवण्यात आलं होतं.

हे वाचा-Gold- Silver Price Today: चांदीचे भाव गडगडले तर सोनं महागलं, इथे तपासा आजचे दर

मीडिया अहवालानुसार, सरकार आणि तेल कंपन्या या गोष्टीवर विचार करत आहे की, घरगुती गॅसच्या ग्राहकांना सिलेंडर बुक करण्यासाठी त्यांच्याच कंपनीवर निर्भर राहावे लागू नये. म्हणजे जर एखाद्याकडे एचपी गॅस सिलेंडर आहे तर तो रिफिल करण्यासाठी त्याला एचपी वरच निर्भर राहावे लागू नये. ते गॅस अन्य कंपन्यांकडूनही रिफिल करू शकतात, अशी सुविधा आणण्याच्या विचारात सरकार आहे.

हे वाचा-Success Story: 'हा' व्यवसाय सुरू करून दोन भाऊ बनले कोट्यवधींचे मालक

ही योजना अंमलात आणण्यासाठी सरकार आणि तेल कंपन्या एक इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म बनवण्याच्या विचारात आहे. इंडियन ऑइल (IOC), भारत पेट्रोलियम (BPCL) आमि हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) या तीन कंपन्या मिळून हा खास प्लॅटफॉर्म बनवणार आहेत. सरकारने या तेल कंपन्यांना याबाबत निर्देश जारी केले आहेत.

First published:
top videos

    Tags: LPG Price