मुंबई, 01 एप्रिल: सरकारी तेल कंपन्यांनी ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. 1 एप्रिलपासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत (LPG Cylinder Price) 250 रुपयांची मोठी वाढ केली आहे. तेल कंपन्यांनी कमर्शिअल गॅस (Commercial LPG Gas Cylinder Price Hike) सिलेंडरच्या किमतीमध्ये ही वाढ केली आहे. तर घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्या ग्राहकांना ही दरवाढ सहन नाही करावी लागणार आहे. तेल कंपन्यांनी 10 दिवसांपूर्वी घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांची वाढ केली होती, त्यावेळी या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत कमी झाली होती. आता व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांना मोठा झटका बसला आहे. एलपीजी गॅस सिलेंडरचे देशातील महानगरांमधील दर नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होत असताना कमर्शिअल गॅस सिलेंडरच्या किंमतीत 250 रुपयांची वाढ झाल्याने मुंबईमध्ये 19 किलोग्रॅमसाठीचा हा दर आता 2,205 रुपयांवर पोहोचला आहे, याआधी दर 1,955 रुपये होता. दिल्लीमध्ये कमर्शिअल गॅस सिलेंडरची किंमत 2,253 रुपयांवर पोहोचली आहे. 1 मार्च रोजी याठिकाणी दर 2,012 रुपये होता, 22 मार्च रोजी जेव्हा या दरात घसरण झाली होती त्यावेळी किंमत 2,003 रुपयांवर पोहोचली होती. हे वाचा- महिन्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत काय झाला बदल? एका क्लिकवर जाणून घ्या दर कोलकातामध्ये दरवाढीनंतर कमर्शिअल गॅस सिलेंडरची किंमत 2,351 रुपये झाली आहे, जी आधी 2,087 रुपये होती. चेन्नईमध्ये या 19 किलोग्रॅमच्या गॅस सिलेंडरची किंमत 2,138 रुपयांवरुन 2,406 रुपयांवर पोहोचली आहे. दरम्यान जरी कमर्शिअल गॅसच्या किंमती वाढल्या असल्या तरी घरगुती गॅसच्या किंमती बदलल्या नाही आहेत. तसंच आज पेट्रोल-डिझेलच्या किमतीतही वाढ झालेली नाही. त्यामुळे सामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पण कमर्शिअल गॅस सिलेंडरच्या किंमती वाढल्याने हॉटेल-रेस्टॉरंटमधील खाणं महाग होऊ शकतं. हे वाचा- 1 एप्रिलपासून महागाईचा बोजा वाढणार; टीव्ही, AC, फ्रीज आणि मोबाइल सेवेसाठीही लागणार जास्त पैसे घरगुती गॅस सिलेंडरच्या काय आहेत किमती? मुंबईमध्ये 14.2 किलोग्रॅमच्या घरगुती गॅस सिलेंडरचे दर 949.50 रुपये आहे. तर दिल्ली, कोलकाता आणि चेन्नईमध्ये दर अनुक्रमे 949.50 रुपये, 976 रुपये आणि 965.50 रुपये प्रति सिलेंडर आहे. बिहारची राजधानी पाटणामध्ये 14.2 किलोग्रॅमच्या एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत 1000 पेक्षा जास्त आहे. याठिकाणी दर 1,39.50 रुपये आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.