Home /News /money /

Cryptocurrency Prices Today: रशिया आणि युक्रेन संघर्षादरम्यान क्रिप्टोकरन्सी धडाम

Cryptocurrency Prices Today: रशिया आणि युक्रेन संघर्षादरम्यान क्रिप्टोकरन्सी धडाम

सर्वात मोठे चलन Bitcoin (Bitcoin Price Today) 7.99 टक्क्यांनी घसरून 34,900.78 डॉलरवर व्यापार करत आहे, तर Ethereum (Ethereum Price Today) ची किंमत गेल्या 24 तासात 9.58 टक्क्यांनी घसरून 2,384.04 डॉलरवर आली आहे.

  मुंबई, 24 फेब्रुवारी : रशिया आणि युक्रेनमधील स्फोटांचे हादरे (Russia Ukraine Crisis)  जगभरातील शेअर बाजारांना बसले आहेत. युरोपपासून आशियापर्यंत सर्वच बाजारपेठा घसरल्या आहेत. गुरुवारी क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्येही मोठी घसरण झाली आहे. आज सकाळी 10:00 वाजता, ग्लोबल क्रिप्टो मार्केट कॅप 8.27 टक्क्यांनी घसरला होता. काल ते 1.72 ट्रिलियन डॉलरच्या तुलनेत आज ते 1.58 ट्रिलियन डॉलर आहे. आज म्हणजे गुरुवारी झालेल्या घसरणीत अशी कोणतीही करन्सी नाही, ज्यामध्ये घसरण झालेली नाही. बिटकॉइनपासून इथरियमपर्यंत सर्व करन्सीमध्ये घसरण झाली आहे. टेरा-लुना वगळता टॉप 10 चलनांमध्ये सुमारे 10 टक्के घसरण झाली आहे. Bloodbath in Share Market: शेअर बाजारात मोठी पडझड, Sensex 1814 अंकांनी घसरला तर Nifty 500 अंकांनी खाली सर्वात मोठे चलन Bitcoin (Bitcoin Price Today) 7.99 टक्क्यांनी घसरून 34,900.78 डॉलरवर व्यापार करत आहे, तर Ethereum (Ethereum Price Today) ची किंमत गेल्या 24 तासात 9.58 टक्क्यांनी घसरून 2,384.04 डॉलरवर आली आहे. गेल्या एका आठवड्याबद्दल बोलायचे झाल्यास, बिटकॉइन 19.88 टक्के कमी झाला आहे, तर इथर 22.34 टक्के कमी झाला आहे. सकाळी 10 वाजेच्या सुमारास क्रिप्टो मार्केटमध्ये बिटकॉइनचे मार्केट वर्चस्व 41.9 टक्के होते, तर Ethereum चे मार्केट वर्चस्व 18.1 टक्के होते.

  Gold Price Today: रशिया-युक्रेन युद्धाचा सोने दरावर मोठा परिणाम, आज भाव 51000 पार, पाहा लेटेस्ट रेट

  कोणत्या करन्सीमध्ये किती घसरण? >> सोलाना (Solana - SOL) - किंमत 76.94 डॉलर, घट: 12.02 टक्के >> डोजीकॉईन (Dogecoin -DOGE) - किंमत: 0.1158 डॉलर, घट : 11.51 टक्के >> कारडॅनो (Cardano – ADA) - किंमत: 0.7997 डॉलर, घट : 11.49 टक्के >> एक्सआरपी (XRP) - किंमत: 0.643 डॉलर, घट: 10.08 टक्के >> एवलॉन्च (Avalanche) - किंमत: 67.10 डॉलर, घट: 11.29 टक्के >>शिबा इनू (Shiba Inu) - किंमत: 0.00002259 डॉलर, घट: 9.41 टक्के >> बीएनबी (BNB) - किंमत: 339.48 डॉलर, घट : 9.35 टक्के >>टेरा लुना (Terra- LUNA) - किंमत: 54.92 डॉलर, घट: 1.79 टक्के
  Published by:Pravin Wakchoure
  First published:

  Tags: Cryptocurrency, Money

  पुढील बातम्या