जाहिरात
मराठी बातम्या / मनी / कर्ज घेण्याची नवी पद्धत, शेअर्स तारण ठेवून घेता येईल Loan; वाचा काय करावं लागेल?

कर्ज घेण्याची नवी पद्धत, शेअर्स तारण ठेवून घेता येईल Loan; वाचा काय करावं लागेल?

कर्ज घेण्याची नवी पद्धत, शेअर्स तारण ठेवून घेता येईल Loan; वाचा काय करावं लागेल?

काही वेळा तातडीने पैशांची गरज भासते. अशावेळी काय करायचं असा प्रश्न असतो. तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक (Investment in Share Market) करत असाल तर हे तुमच्यासाठी फायद्याचं ठरू शकेल.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 07 जानेवारी: काही वेळा तातडीने पैशांची गरज भासते. अशावेळी काय करायचं असा प्रश्न असतो. तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक (Investment in Share Market) करत असाल तर हे तुमच्यासाठी फायद्याचं ठरू शकेल. आपत्कालीन परिस्थितीत शेअर्स तारण ठेवून कर्जही (Loan against shares) घेऊ शकता. यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही ही प्रक्रिया ऑनलाइन पूर्ण करू शकता. तुमच्या सोयीनुसार शेअर्स तारण ठेवून मिळालेले कर्ज तुम्ही वापरू शकाल. ब्रोकरेज फर्म जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसची (Geojit Financial Services) NBFC शाखा जिओजित क्रेडिट्सने बुधवारी शेअर्स (loans against shares-LAS)वर कर्ज देण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म लॉन्च केला. नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लि. (NSDL) मध्ये नोंदणी असणाऱ्या कोणत्याही डिमॅट अकाउंट होल्डरला शेअरच्या बदल्यात लोन देणारी जिओजित ही पहिली कंपनी ठरली आहे. हे वाचा- Gold Price Today: सोन्याचांदीची झळाळी उतरली, काय दराने मिळतायंत हे मौल्यवान धातू कुणाला मिळेल कर्ज? जिओजित ग्रुपचे संस्थापक आणि एमडी सी.जे. जॉर्ज यांनी अशी माहिती दिली की, ज्या ग्राहकांना एलएएस डिजिटल प्लॅटफॉर्मवर त्यांचे शेअर्स गहाण ठेवून कर्जासाठी अर्ज करायचा आहे, त्यांच्याकडे त्यांच्या डिमॅट खात्यांमध्ये पात्र शेअर्सची फ्री होल्डिंग असणे आवश्यक आहे. तसेच, त्यांचा CIBIL स्कोअर समाधानकारक असावा. NSDL मध्ये डिमॅट खाते असलेले सर्वजण या सुविधेअंतर्गत कर्जासाठी अर्ज करू शकतात. ब्रोकर कोण आहे याचाही फरक पडणार नाही. ऑनलाइन मिळेल लोन जॉर्ज यांनी दिलेल्या माहितीनुसार तुम्ही तुमच्या आवडीची स्कीम निवडू शकता आणि कागदपत्रांची प्रक्रिया ऑनलाइन पूर्ण करू शकता. कर्जाच्या अर्जावर डिजिटल स्वाक्षरी झाल्यावर आणि स्वीकृतीनंतर, रक्कम ग्राहकाच्या बँक खात्यात जमा केली जाईल आणि वापरलेल्या रकमेवर व्याज द्यावे लागेल. हे वाचा- काय आहे तुमचं Status? PM Kisan च्या स्टेटसमध्ये असं लिहून आल्यास काय होतो अर्थ मनीकंट्रोल डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, कोची याठिकाणच्या एनएसडीएलच्या एमडी पद्मजा चंद्रू यांनी दिलेल्या माहितीनुसार, डिजिटल LSA सुविधा इनव्हेस्टर्सना त्वरित लिक्विडिटी उपलब्ध करून देण्यासाठी बनवण्यात आली आहे. याचा उद्देश्य गुंतवणूकदारांना गुंतवणुकीसाठी फंड उभारता यावा किंवा आपात्कालीन खर्च भागवता यावा असा आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात