Home /News /money /

Gold Price Today: सोन्याचांदीची झळाळी उतरली, काय दराने मिळतायंत हे मौल्यवान धातू

Gold Price Today: सोन्याचांदीची झळाळी उतरली, काय दराने मिळतायंत हे मौल्यवान धातू

जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सध्या तुमच्याकडे चांगली संधी (Gold Investment Opportunity) आहे. कारण सोन्याचा भाव पुन्हा एकदा 48 हजारांच्या (Gold Price Today) खाली आला आहे.

    मुंबई, 06 जानेवरी: जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सध्या तुमच्याकडे चांगली संधी (Gold Investment Opportunity) आहे. कारण सोन्याचा भाव पुन्हा एकदा 48 हजारांच्या (Gold Price Today) खाली आला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (Gold Rate on MCX) वर आज सोन्यासोबतच चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. MCX वर, फेब्रुवारीच्या डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव आज 0.51 टक्क्यांनी घसरला, तर चांदीच्या किमती (Silver Rate Today) 1.42 टक्क्यांनी घसरल्या आहेत. सोने 8,425 रुपयांनी स्वस्त ऑगस्ट 2020 मध्ये MCX वर सोन्याने 56,200 रुपये प्रति तोळाची सर्वोच्च पातळी (Gold Rate on Record High) गाठली होती. आज, MCX वर फेब्रुवारीच्या सोन्याची वायदे किंमत 47,775 रुपये प्रति तोळाच्या पातळीवर आहे. अर्थात आज सोने सुमारे 8,425 रुपयांनी स्वस्त आहे. आजची सोन्याचांदीची किंमत (Gold-Silver Rate Today) फेब्रुवारी डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव आज 0.51 टक्क्यांनी घसरून 47,775 रुपये प्रति तोळावर पोहोचला आहे. त्याचबरोबर आजच्या व्यवहारात चांदीही खूप स्वस्त झाली आहे. आज 1 किलो चांदीचा भाव 1.42 टक्क्यांनी घसरून 61,356 रुपयांवर आला आहे. हे वाचा-नजरचुकीनं दुसऱ्याच खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्यास परत मिळतील का? वाचा सविस्तर कशी तपासाल सोन्याची शुद्धता तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. 'BIS Care App'द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे. घरबसल्या जाणून घ्या सोन्याचा दर सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Silver

    पुढील बातम्या