मराठी बातम्या /बातम्या /मनी /

होम लोन ट्रान्सफर करताना तुम्ही केलीय का ही चूक, वेळीच सुधारा

होम लोन ट्रान्सफर करताना तुम्ही केलीय का ही चूक, वेळीच सुधारा

लोन ट्रान्सफर करताना तुम्ही तर या जाळ्यात फसत नाही ना? आताच चेक करा बुआ नंतर गडबड नको....

लोन ट्रान्सफर करताना तुम्ही तर या जाळ्यात फसत नाही ना? आताच चेक करा बुआ नंतर गडबड नको....

लोन ट्रान्सफर करताना तुम्ही तर या जाळ्यात फसत नाही ना? आताच चेक करा बुआ नंतर गडबड नको....

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kranti Kanetkar

मुंबई : सध्या लोन घेणं आवाक्याबाहेर होत आहे. व्याजदर वाढत आहेत. त्यात खासगी बँका मोठ्या प्रमाणात व्याजदर वाढवत आहेत. सामान्य नागरिकाला घर घेण्यासाठी पैसे उभे करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे गृहकर्ज. आपल्याला एकरकमी मोठी रक्कम भरण्याची चिंता करण्याची आवश्यकता नाही.

आपण महिन्याला हप्त्यांमध्ये त्याची भरपाई करू शकता जेणेकरून आपल्या खिशावर फारसा परिणाम होणार नाही. गृहकर्जाच्या ईएमआयमध्ये मुद्दल आणि व्याजाचा काही भाग असतो, जो तुम्हाला दर महिन्याला बँकेत भरावा लागतो.

जर तुम्हाला खासगी बँकेचे लोन जास्त पडत असेल आणि तुम्हाला जर ते दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करायचं असेल तर ते कसं करणार आणि कोणत्या चुका करू नयेत याबाबत आज महत्त्वाची माहिती जाणून घेऊया.

ट्रान्सफर फीकडे लक्ष द्या

होम लोन ट्रान्सफर करण्यापूर्वी प्रोसेसिंग फीसह इतर किती खर्च होणार आहे. याची नीट माहिती घ्यायला हवी. नाहीतर व्याजदर कमी आणि प्रोसेसिंग फी जास्त अशी गत होते. व्याज दर कमी असेल, पण तुमची बचत कर्जाचा कालावधी, बॅलन्स ट्रान्सफरसाठीचे शुल्क आणि इतर लहान-मोठे शुल्क यावरही अवलंबून असते.

EPFO खातं बंद झालं तर व्याज मिळणार, काय सांगतो नियम?

अटी नियम नीट वाचा

वेगवेगळ्या बँका गृहकर्जासाठी वेगवेगळ्या अटी घालतात. त्यांच्या सेवा वेगळ्या असू शकतात. जर एखादी बँक तुम्हाला अधिक चांगली सेवा देत असेल, तर तुम्ही बँक बदलण्याचे हे एकमेव कारण असू नये. त्या बँकेच्या बाकी काही गोष्टी तपासायला हव्यात. बँकेचा ट्रॅक रेकॉर्ड काय आहे, पारदर्शकता किती आहे, कोणत्याही प्रकारचे संशयास्पद वर्तन आपल्यासाठी पुढे त्रासदायक ठरू शकते.

किसान क्रेडिट कार्ड योजना नेमकी काय, कोण घेऊ शकतं लाभ?

टेन्यूअरमध्ये अडकवलं जातं

कर्जदारांनी बॅलन्स ट्रान्सफरचा पर्याय निवडण्यापूर्वी गृहकर्जाच्या कालावधीकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे. ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. समजा, तुमचा ईएमआय कमी आहे कारण कार्यकाळ वाढला आहे, अशा परिस्थितीत तुम्ही जास्त व्याज ट्रान्सफर करत आहात आणि एकूण कर्ज तुम्हाला शेवटी महागात पडेल.

First published:

Tags: Home Loan, Instant loans, Loan, Pay the loan, Sbi home loan