मुंबई : सरकारी असो वा खासगी कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी बेसिक पगाराच्या 12 टक्के रक्कम ही EPFO मध्ये जमा केली जाते. यामध्ये कर्मचारी आणि संस्था दोघांचेही पैसे जमा होत असतात. त्यावर EPFO दरवर्षी व्याज देते. जी खाती सध्या अॅक्टिव्ह आहेत त्यांना सरकारच्या नियमानुसार व्याज मिळत राहातं. मात्र जे खातं बंद आहे त्यावर सरकार व्याजदर देतं का? याबाबत आज जाणून घेणार आहोत.
EPFO खातं हे नोकरदारांसाठी उघडलं जातं. आपत्कालीन स्थितीमध्ये तुम्ही EPFO मधून पैसे काढू शकता. त्यात जमा झालेल्या पैशांवर सरकारकडून व्याज दिले जाते. आणीबाणीच्या वेळी ईपीएफ खात्यातून पैसे काढता येतात. मात्र, मधल्या काळात या खात्यातून पैसे काढले नाहीत, तर निवृत्तीच्या वेळी चांगला फंड उभा करू शकता.
तुम्ही ईपीएफ खातेधारक असाल तर तुम्हाला दरवर्षी व्याज दिलं जाईल. एखाद्या सदस्याने तीन वर्षे ईपीएफमध्ये योगदान दिले नसेल तर व्याजाचे पैसे रोखण्याचा निर्णय २०१३ मध्ये घेण्यात आला होता. तरी २०१६ मध्ये हा निर्णय मागे घेण्यात आला. म्हणजेच सर्व खात्यांवर व्याज दिले जाईल.
जर संपूर्ण पैसे खात्यातून काढले असतील आणि त्याचा वापर होत नसेल तर त्यावर व्याज दिले जाणार नाही. त्याचबरोबर ईपीएफ खात्याचा सेवानिवृत्तीचा कालावधी पूर्ण झाला असेल तर व्याजही दिले जाणार नाही. तसेच खातेदारांचे वय ५८ वर्षे असेल आणि ईपीएफची शिल्लक बराच काळ निश्चित केलेली नसेल तर व्याजाची रक्कम दिली जाणार नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.