मराठी बातम्या /बातम्या /मनी /

loan tips : जर आली पैशाची अडचण? मग Car Loan वर घेता येते टॉप-अप कर्ज

loan tips : जर आली पैशाची अडचण? मग Car Loan वर घेता येते टॉप-अप कर्ज

तेव्हा तुम्ही अगदी हौसेने तुमची आवडती कार घेतली असेल आणि अचानक काही मोठा खर्च उद्भवला तर काळजी करू नका.

तेव्हा तुम्ही अगदी हौसेने तुमची आवडती कार घेतली असेल आणि अचानक काही मोठा खर्च उद्भवला तर काळजी करू नका.

तेव्हा तुम्ही अगदी हौसेने तुमची आवडती कार घेतली असेल आणि अचानक काही मोठा खर्च उद्भवला तर काळजी करू नका.

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 29 नोव्हेंबर : अनेकदा घर (Home) किंवा गाडी (Car)घेण्यासाठी कर्ज (Loan)घेतलेलं असतानाच अचानक एखादा मोठा खर्च उद्भवतो, अशावेळी अतिरिक्त निधीची आवश्यकता भासते. तेव्हा याची तरतूद कशी करायची असा यक्षप्रश्न उभा राहतो. त्यामुळे अनेकजण कार विकून टाकण्याचा निर्णय घेतात. आपल्या स्वप्नातील कार अशाप्रकारे गेली की त्याचे दुःख सर्वांनाच होते. हे सर्व टाळता येत यासाठी अगदी सहज सोपी सुविधा उपलब्ध आहे. ती म्हणजे टॉप-अप कर्ज (Top-Up Loan) सुविधा. अनेकांना याबाबत फारशी माहिती नसते. या सुविधेमुळे कर्जदारासमोर उभं ठाकलेलं मोठं संकट अगदी सहजपणे दूर होऊ शकतं. काय आहे नेमकी ही सुविधा,  त्याचा कसा फायदा होतो, याबाबत जाणून घेऊ या.

समजा, तुम्ही तुमची आवडती कार घेण्यासाठी कर्ज घेतलं आहेत आणि त्यानंतर काही काळातच अचानक घरात एखाद्याचं किंवा तुमचंच मोठं आजारपण आलं, अचानक कोणाचं लग्नकार्य (Wedding) ठरलं किंवा घरात दुरुस्तीचं मोठं काम उभं राहिलं, तर त्यासाठी लागणारी रक्कम कुठून आणि कशी उपलब्ध करायची असा प्रश्न उभा राहतो. अशावेळी तुम्ही ज्या बँकेतून (Bank) किंवा वित्तीय संस्थेतून (NBFC) कर्ज घेतलं असेल तिथूनच त्या कर्जावर टॉप-अप कर्ज घेण्याची सुविधा मिळते. तुम्ही वेगळ्या बँकेकडून किंवा वित्तीय संस्थेकडूनही असे टॉप-अप कर्जदेखील मिळवू शकता. त्यामुळे तुमची समस्या अगदी चुटकीसरशी सुटू शकते. एचडीएफसी, कोटक महिंद्रा बँक, अॅक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँक या बँका तसेच विविध वित्तीय संस्था टॉप-अप कर्ज सुविधा देतात.

सर्व साधारणपणे तुमच्या कार कर्जाच्या 150 टक्क्यांपर्यंत टॉप-अप कर्ज मिळू शकते. टॉप-अप कर्ज म्हणून तुम्ही किती कर्ज घेऊ शकता हे कर्जदाराच्या सध्याच्या कार कर्जाचे मूल्य, कर्ज परतफेडीचा इतिहास, कर्जदाराचे वय आणि कारचे मॉडेल इत्यादी विविध घटकांवर अवलंबून असते.  प्रत्येक बँक आणि वित्तीय संस्था यांच्या याबाबतीतल्या अटी वेगळ्या असतात.

फ्लेक्स-इंधन इंजिनमुळे पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या कोट्यवधी वाहनांचं काय होणार?

टॉप-अप कर्ज घेण्याचा हा पर्याय सर्वात सोयीचाही असतो. कारण यामध्ये त्वरीत प्रक्रिया केली जाते. तसेच तुम्ही ज्या बँकेकडून कार घेण्यासाठी कर्ज घेतले असेल त्याच बँकेकडून टॉप-अप कर्ज घेतलं तर ती प्रक्रिया अगदी सहज आणि जलद गतीने पार पडते. कारण कर्ज देणाऱ्या बँकेकडे किंवा वित्तीय संस्थेकडे तुमची सर्व माहिती आधीच असते. त्यामुळं अगदी कमी कागदपत्रांची (Documents)आवश्यकताही  भासते. पुन्हा नव्याने कागदपत्रे देण्याची गरज नसते.

तुम्ही आधीच्या कार कर्जाचे हप्ते (EMI) नियमितपणे भरत असाल, तर तुम्ही तुमच्या सध्याच्या कार कर्जावर टॉप-अप कर्ज घेण्यासाठी पात्र ठरता. किमान 9 महिने तुम्ही कर्जाचे हप्ते नियमितपणे फेडल्याची नोंद असणे आवश्यक आहे. अर्थात ही अट प्रत्येक बँक किंवा वित्तीय संस्थेनुसार बदलू शकते. एचडीएफसी बँक 9 महिन्याचे रेकॉर्ड ग्राह्य धरते तर अॅक्सिस बँक 12 महिन्यांचे रेकॉर्ड तपासते.

तसेच किती टॉप-अप कर्ज मिळणार याबाबतही प्रत्येक बँक आणि वित्तीय संस्थेच्या अटींमध्ये फरक असू शकतो. उदाहरणार्थ, एचडीएफसी (HDFC) बँकेकडून 150 टक्क्यांपर्यंत टॉप-अप कर्ज मिळू शकते. कोटक महिंद्रा बँकेतर्फे ईएमआयच्या 25 पटपर्यंत टॉप-अप कर्ज मिळू शकते. अॅक्सिस बँक कारच्या किंमतीच्या 50 टक्के टॉप-अप कर्ज देते.

जंगलाचा राजा सिंह आणि पर्यटकांमध्ये रंगला Tug of war; कधीच पाहिला नसेल असा VIDEO

या कर्जाचा व्याजदर थोडा अधिक असतो. सर्वसाधारणपणे सर्व बँकांचा कार कर्जाचा व्याजदर हा 7 ते 8.50 टक्के असतो. वित्तीय संस्थांचा व्याजदर काहीसा अधिक असतो. या व्याजदरापेक्षा टॉप-अप कर्जाचा व्याजदर (Interest Rate)अधिक असतो. आयसीआयसीआय बँक 9.35 टक्के दराने, अॅक्सिस बँक 13.99 टक्के दराने टॉप-अप कर्ज देते.

ज्या बँकेतून आधीचे कार लोन घेतले आहे त्याच बँकेतून टॉप-अप कर्ज घेतल्यास कोणतीही कागदपत्रे नव्याने द्यावी लागत नाही. ऑनलाइन अर्ज करता येतो आणि काही वेळात तुमच्या खात्यात पैसे जमा केले जातात. तसंच बँका किंवा वित्तीय संस्था कर्ज देताना तुमच्या कारची तपासणी करत नाहीत. हे त्या बँकेवर अवलंबून असते.  या कर्जाच्या परतफेडीसाठी  12 महिने, 24 महिने आणि 36 महिने असे पर्याय मिळू शकतात.

तेव्हा तुम्ही अगदी हौसेने तुमची आवडती कार घेतली असेल आणि अचानक काही मोठा खर्च उद्भवला तर काळजी करू नका. तुम्ही टॉप-अप कर्ज घेऊन तुमची गरज भागवू शकता. ज्या बँकेतून कर्ज घेतले असेल त्याच बँकेतून हे कर्ज घेणं सोयीचं होतं, मात्र दुसरीकडून कर्ज घेण्याचीही सुविधा मिळते. टॉप-अप कर्ज सुविधेमुळे अनेकांना अडचणीच्या वेळी मदतीचा मोलाचा हात मिळण्याची सोय झाली असून, अनेकांना मोठा दिलासा मिळतो. त्यामुळं या कर्जालाही मोठी मागणी असते. बँक आणि वित्तीय संस्थांच्या कर्ज व्यवसायात या कर्जाचाही मोठा हिस्सा आहे.

First published: