Home /News /viral /

जंगलाचा राजा आणि पर्यटकांमध्ये रंगला Tug of war; कधीच पाहिला नसेल सिंहाचा असा VIDEO

जंगलाचा राजा आणि पर्यटकांमध्ये रंगला Tug of war; कधीच पाहिला नसेल सिंहाचा असा VIDEO

जंगलाच्या राजाचं कधीच पाहिलं नसेल असं रूप.

    मुंबई, 29 नोव्हेंबर : आतापर्यंत जंगलाचा राजा सिंहाला (Lion video) तुम्ही शिकार करताना पाहिलं असेल. आपल्या शिकाराच्या मागे किंवा पर्यटकांच्या गाडीमागे धावताना पाहिलं असेल. पण सिंहाला कधी टग ऑफ वॉर (Lion tug of war video)  खेळताना पाहिला आहे का? सध्या अशाच एका सिंहाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे (Lion viral video). चक्क पर्यटकांसोबत सिंहाची रश्शीखेच स्पर्धा लागली (Lion tug of war with animal video). सिंहाचं असं रूप या व्हिडीओत दिसून आलं आहे जे तुम्ही याआधी कधीच पाहिलं नसावं. एका बाजूला सिंह आणि दुसऱ्या बाजूला पर्यटक यांच्यात रंगलेल्या टग ऑफ वॉरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगला चर्चेत आहे. सिंहाने आपल्या जबड्यात दोरी धरली आहे आणि प्रतिस्पर्ध्यांना म्हणजे पर्यटकांना खेचण्याचा तो प्रयत्न करतो आहे. व्हिडीओ पाहून नेटिझन्स थक्क झाले आहेत. व्हिडीओत पाहू शकता एका झाडामध्ये अडकलेली एक दोरी दिसते. थोड्या वेळाने ही दोरी खाली पडते आणि झाडाच्या मागून एक सिंह येतो. सिंह दोरी आपल्या जबड्यात धरतो. दुसऱ्या बाजूचं दृश्य व्हिडीओत दिसत नाहीत. पण सिंहाच्या समोर पर्यटक आहे. त्यांच्या सफारी गाडीला ही दोरी बांधलेली असावी. एकिकडे सिंह आणि दुसरीकडे पर्यटक अशी दोघांमध्ये रस्सीखेच सुरू होती. हे वाचा - गरागरा फिरत उंच जाणाऱ्या झोपाळ्यावर खतरनाक स्टंट; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO ग्रेटर युझर नावाच्या फेसबुक युझरने आपल्या अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. पाहा कोण आमची मदत करायला आला. असं कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिलं आहे. या व्हिडीओत त्याने दिलेल्या माहितीनुसार प्राण्यांसोबत खेळण्याचा उद्देश नव्हता. त्यांची गाडी एका ठिकाणी अडकली होती आणि ती बाहेर काढण्यासाठी गाडीला अशी दोरी बांधण्यात आली. ती दोरी काढणार इतक्यात सिंह तिथं आला आणि त्याने आपल्या जबड्यात ती दोरी धरली. त्यानंतर सिंहाच्या जबड्यातून ती दोरी काढण्यासाठी म्हणून हळूहळू गाडी चालवण्यात आली. सिंहाला दुखापत पोहोचवण्याचा उद्देश नव्हता आणि सिंहाला तशी कोणतीही हानी पोहोचली नाही. हे वाचा - अजबच! म्हणे, 'हाच माझा नवरा'; आजीबाईने चक्क गाईशीच बांधली लग्नगाठ कारण... या व्हिडीओमागील नेमकी स्टोरी वेगळी असली तर पहिल्यांदा पाहणाऱ्यााल ही सिंहासोबत रंगलेली रश्शीखेच स्पर्धाच वाटते. व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच कमेंट येत आहे. काही युझर्सनी याल अद्भुत दृश्य म्हटलं आहे. याआधी आम्ही अशी रश्शीखेच आयुष्यात कधीच पाहिली नाही, असं काही युझर्सनी म्हटलं आहे. कदाचित यावेळी आम्ही तिथं असतो, असंही काही जणांनी म्हटलं आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Viral, Viral videos, Wild animal

    पुढील बातम्या