मराठी बातम्या /बातम्या /explainer /

Flex Engine: फ्लेक्स-इंधन इंजिनमुळे पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या कोट्यवधी वाहनांचं काय होणार?

Flex Engine: फ्लेक्स-इंधन इंजिनमुळे पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या कोट्यवधी वाहनांचं काय होणार?

Flex-Fuel-Conversion-How-To-Make-A-Car to Flex engine/Flex fuel conversion kit: फ्लेक्स इंजिन तंत्रज्ञानात ब्राझील जगात आघाडीवर आहे. तेथे कारपासून ट्रकपर्यंत कोट्यवधी वाहनांमध्ये फ्लेक्स इंधन इंधन म्हणून वापरले जाते. भारतातही येत्या काही महिन्यांत फ्लेक्स-इंधन इंजिन अनिवार्य करण्याची चर्चा आहे. अशा स्थितीत सध्या देशातील रस्त्यांवर धावणाऱ्या कोट्यवधी वाहनांचं काय होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आगामी काळात पेट्रोल-डिझेलवर चालणारी वाहने हळूहळू संपतील का?

पुढे वाचा ...
  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 29 नोव्हेंबर: फ्लेक्स इंजिन तंत्रज्ञानात ब्राझील जगात आघाडीवर आहे. तिथं कारपासून ट्रकपर्यंत कोट्यवधी वाहनांमध्ये इंधन म्हणून फ्लेक्स Fuel वापरले जाते. याl 85 टक्के इथेनॉल आणि 15 टक्के पेट्रोल किंवा डिझेल (Petrol Diesel) वापरले जाते. भारतातही येत्या काही महिन्यांत फ्लेक्स-इंधनावर चालणारी इंजिने अनिवार्य करण्याची चर्चा आहे. अशा स्थितीत सध्या देशातील रस्त्यांवर धावणाऱ्या कोट्यवधी वाहनांचं काय होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आगामी काळात पेट्रोल-डिझेलवर चालणारी वाहने हळूहळू संपतील का? किंवा आपण आपलं सध्याचं वाहन फ्लेक्स इंजिनमध्ये (Flex Engine) रूपांतरित करू शकतो का? भविष्यात काय होणार आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

फ्लेक्स इंजिनबद्दल bellperformance.com या वेबसाइटवर प्रकाशित केलेल्या ब्लॉगनुसार, फ्लेक्स इंजिन ब्राझीलमध्ये E85 म्हणून ओळखले जाते. याचा अर्थ 85 टक्के इथेनॉलवर चालणारे इंजिन. जेव्हा एखादे इंजिन इंधन म्हणून 85 टक्के इथेनॉल वापरते, तेव्हा त्याला फ्लेक्स इंधन इंजिन म्हटले जाऊ शकते.

सध्या पेट्रोलमध्ये किती टक्के इथेनॉल मिसळलं जातं?

या वर्षी 5 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली होती की, पुढील पाच वर्षांत देशात 20 टक्के इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळले जाईल. इथेनॉलवर जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जारी केलेल्या अहवालात भारताला 2005 च्या तुलनेत 2030 पर्यंत कार्बन उत्सर्जन 33-35 टक्क्यांनी कमी करायचे आहे, असे म्हटले आहे. त्यासाठी पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

EXPLAINER : एका वर्षात भारतात येणार Flexi Fuel इंजिनच्या गाड्या, इंधनाचे दर घसरणार!

भारत सरकारने आता 2025 पर्यंत पेट्रोल आणि डिझेलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रित करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. सध्या पेट्रोलमध्ये 8.5 टक्के इथेनॉल मिसळले जाते. विशेष म्हणजे देशात 87 टक्के इथेनॉल ऊसापासून तयार केलं जातं. यामुळे इथेनॉलचा इंधन म्हणून वापर करण्यास प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल.

तुमची कार अशा फ्लेक्स इंजिनमध्ये बदलता येईल का?

गेल्या काही वर्षांपासून देशात आणि जगात तयार होत असलेल्या वाहनांची इंजिने फ्लेक्स इंधनावर चालण्यास पूर्णपणे सक्षम आहेत. कारण इंधन बदलल्याने इंजिनमध्ये कोणताही आमूलाग्र बदल होत नाही. जुन्या इंजिनमध्ये इंधन प्रणालीसाठी स्टील किंवा कॉर्क गॅस्केटचा (Cork gaskets) वापर केला जात असे. दीर्घकाळ इथेनॉल किंवा पाण्याच्या संपर्कात राहिल्यास ते समस्या निर्माण करतात. परंतु, आधुनिक इंजिन इंधन प्रणालीसाठी भिन्न धातू वापरतात. या कारणास्तव, त्यांना इथेनॉल किंवा पाण्यामुळे ही समस्या येत नाही. गेल्या जवळपास दशकापासून सर्व वाहनांमध्ये हा बदल झाला आहे.

पेट्रोल-डिझेल विसरा, आता येणार हायड्रोजनवर चालणारी Car

इंधन इंजेक्शनमध्ये बदल

वास्तविक, जर तुम्ही तुमच्या सध्याच्या कारमध्ये 85 टक्के इथेनॉल वापरत असाल, तर इंधन प्रणालीला हळूहळू खराब करते. हे नुकसान हळूहळू होईल आणि गाडी चालवताना तुम्हाला ते कळणार नाही. अशा स्थितीत, जर तुम्ही नियमितपणे फ्लेक्स इंधन म्हणजेच 85 टक्के इथेनॉलवर स्विच करत असाल, तर तुम्हाला वाहनाच्या इंजिनचे इंजेक्टर बदलावे लागतील.

इथेनॉल पेट्रोल आणि डिझेलपेक्षा 25% कमी ऊर्जा देतं

जीवाश्म इंधनाच्या तुलनेत इथेनॉल 25 टक्के ऊर्जा पुरवते. अशा परिस्थितीत, पेट्रोल किंवा डिझेल इंजिनच्या बरोबरीने ऊर्जा निर्माण करण्यासाठी फ्लेक्स इंजिनच्या ज्वलन कक्षामध्ये (combustion chamber) अधिक इथेनॉलची आवश्यकता असेल. या स्थितीत, फ्लेक्स इंजिनला विस्तीर्ण इंजेक्टरची आवश्यकता असते, जे इंधन हवेच्या मिश्रणात 40 टक्के अधिक द्रव इंधन टाकते. अशा प्रकारे, अनेक तांत्रिक समस्या आहेत, ज्यामुळे तुम्ही देशात सध्या असलेल्या वाहनांमध्ये फ्लेक्स इंधन वापरू शकत नाही.

आता उडताना दिसणार Flying Car! विमानतळांदरम्यान चाचणी उड्डाण यशस्वी

मग आपण काय करावे...

जर तुमच्या कारमध्ये इंधन इंजेक्टर असतील, जे दोन दशकं जुन्या असलेल्या जवळपास सर्व वाहनांमध्ये असतात, तर तुम्हाला फक्त दोनच गोष्टी करायच्या आहेत. पहिली यासाठी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कंट्रोल मॉड्यूलची आवश्यकता असेल. ते फ्ल्यू इंजेक्टर आणि फॅक्टरी फ्युएल इंजेक्टर इलेक्ट्रिकल कनेक्टर यांच्यामध्ये बसवले जाईल. जगातील सर्व कंपन्या ते बनवत आहेत. याशिवाय, तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंधन सेंसर, जो तुमच्या वाहनातील इथेनॉल आणि पेट्रोल-डिझेलचे प्रमाण शोधेल. हा इंधन सेन्सर इलेक्ट्रिक कंट्रोल मॉड्यूलशी जोडला जाईल. तुमच्या इंधनातील इथेनॉलच्या प्रमाणानुसार किती इंधन वापरायचे हे ही यंत्रणा ठरवेल. इंधनात इथेनॉल जास्त असेल तर त्याचा जास्त वापर होतो.

First published: