मुंबई : ऑक्टोबर महिना सणवार असल्याने कसा पटकन निघून गेला कळलं देखील नाही. बघता बघता महिना संपत आला. तुमची बँकेतील काही महत्त्वाची कामं असतील तर ती या महिन्यात किंवा पुढच्या महिन्यात उरकून घ्या. हा महिना तसा सणावार असल्याने सुट्ट्या जास्त होत्या. पण पुढच्या महिन्यातही 10 दिवस बँका बंद राहणार आहेत. तुम्ही जर बँकेशी निगडीत काही महत्त्वाचं काम करणार असाल तर तुम्हाला या सुट्ट्या माहिती असायला हव्यात. रिजर्व बँक ऑफ इंडियाने (RBI) ने नोव्हेंबर 2022 मधील बँकेच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. या लिस्टमध्ये १० दिवस बँका बंद राहणार असल्याचं सांगितलं जात आहे.बँकेत आवश्यक ती कामे करायची असतील तर ती एक दिवस आधी निकाली काढावीत. नेट बँकिंग, एटीएम, डिजिटल पेमेंटच्या माध्यमातूनही तुम्ही तुमचं काम करू शकता.
Pune : चक्क रांगा लावून केली सोन्याची खरेदी, दिवाळीत 100 कोटींची उलाढाल, VIDEOरिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) बँक हॉलिडे लिस्टची तीन श्रेणींमध्ये विभागणी केली आहे. राष्ट्रीय सुट्ट्यांबरोबरच काही राज्यांसाठी विशिष्ट सुट्या असतात, त्यात सर्व रविवार तसेच महिन्यातील दुसरा आणि चौथा शनिवार यांचाही समावेश असतो.
1 नोव्हेंबर 2022 - कन्नड राज्योत्सव/कुट - बंगळुरु आणि इम्फाळमध्ये बँका बंद 6 नोव्हेंबर 2022 - रविवार (साप्ताहिक सुट्टी) 8 नोव्हेंबर 2022 - गुरुनानक जयंती/कार्तिक पौर्णिमा/रास पौर्णिमा/वांगला महोत्सव आगरतळा, बेंगळूरू, गंगटोक, गुवाहाटी, इम्फाल, कोची, पणजी, पाटणा, शिलाँग आणि तिरुअनंतपुरम वगळता इतर ठिकाणी बँका बंद 11 नोव्हेंबर 2022 - कनकदास जयंती/वांगला महोत्सव - बंगळुरु आणि शिलाँगमध्ये बँका बंद 12 नोव्हेंबर 2022 - शनिवार (महिन्याचा दुसरा शनिवार) 13 नोव्हेंबर 2022 - रविवार (साप्ताहिक सुट्टी)
पॉलिसी होल्डरचा मृत्यू झाल्यावर कोण भरणार प्रीमियम? काय आहे LIC चं धोरण20 नोव्हेंबर 2022 - रविवार (साप्ताहिक सुट्टी) 23 नोव्हेंबर 2022 - सेंग कुत्सनेम- शिलाँगमध्ये बँका बंद 26 नोव्हेंबर 2022 - शनिवार (महिन्यातील चौथा शनिवार) 27 नोव्हेंबर 2022 - रविवार (साप्ताहिक सुट्टी)