जाहिरात
मराठी बातम्या / मनी / पॉलिसी होल्डरचा मृत्यू झाल्यावर कोण भरणार प्रीमियम? काय आहे LIC चं धोरण

पॉलिसी होल्डरचा मृत्यू झाल्यावर कोण भरणार प्रीमियम? काय आहे LIC चं धोरण

LIC

LIC

. ‘एलआयसी जीवन लक्ष्य’ या पॉलिसीमध्ये ग्राहकांना चांगल्या परताव्याची आणि पैशाच्या सुरक्षिततेची हमी मिळेल याची काळजी घेतली गेली आहे.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई : पैशांची बचत आणि गुंतवणूक ही काळाची गरज आहे. त्यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. भविष्यातील फायनॅन्शियल सिक्युरिटीसाठी एलआयसी पॉलिसींना सर्वांत सेफ पर्याय मानलं जातं. एलआयसी वेळोवेळी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन फायदे देणाऱ्या पॉलिसी घेऊन येते. आता एलआयसीची अशी एक पॉलिसी आली आहे ज्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करून तुम्हाला सुरक्षेची खात्री आणि चांगले रिटर्न्स मिळू शकतात. ‘एलआयसी जीवन लक्ष्य’ या पॉलिसीमध्ये ग्राहकांना चांगल्या परताव्याची आणि पैशाच्या सुरक्षिततेची हमी मिळेल याची काळजी घेतली गेली आहे. एलआयसी जीवन लक्ष्य पॉलिसी तुम्ही 13 पासून ते 25 वर्षांच्या काळासाठी विकत घेऊ शकता. ज्यामध्ये 18 ते 55 वयोगटातील लोक गुंतवणूक करू शकतात. मुदतपूर्तीच्या तारखेच्या तीन वर्ष आधीपर्यंत प्रीमिअम भरावा लागतो. पॉलिसी मॅच्युरीची कमाल वय मर्यादा 65 वर्षे आहे. पॉलिसीधारकाला या प्लॅनमध्ये एक लाख रुपयांपर्यंतची विमा रक्कम मिळते. या पॉलिसीत तुम्ही दरमहा, तीन महिने, सहा महिने आणि वार्षिक अशा कालावधीत प्रीमियम जमा करू शकता. एलआयसीची जीवन लक्ष्य पॉलिसी अशा काही पॉलिसींपैकी एक आहे, ज्यामध्ये पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतरही पॉलिसी मॅच्युरीटी पूर्ण करते. या पॉलिसीमध्ये, पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर बाकीचे प्रीमिअम कंपनी भरते. दरवर्षी 10 टक्के हिस्सा विमा रकमेच्या स्वरूपात पॉलिसीधारकाच्या नॉमिनीला दिला जातो. पॉलिसी मॅच्युअर झाल्यानंतर नॉमिनीला उर्वरित पैसे दिले जातात. एलआयसीची जीवन लक्ष्य ही पॉलिसी दीर्घकाळ चालणारी आहे. त्यामुळे तुम्ही तरुणपणात ही पॉलिसी घेऊन उतारवयामध्ये त्याचे रिर्टन्स मिळवू शकता. म्हणजे तुमच्या वृद्धापकाळामध्ये ही पॉलिसी तुमचा आधार ठरू शकते. या शिवाय, पॉलिसी होल्डर व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना मोठा आर्थिक आधार मिळू शकतो.

    News18लोकमत
    News18लोकमत

    विशेष म्हणजे, जर काही कारणास्तव पॉलिसी लॅप्स मोडवर गेली तर अशा ग्राहकांसाठी एलआयसीने आता एक कँपेन सुरू केलं आहे. ज्यामध्ये तुम्ही तुम्ही उर्वरित प्रीमिअम भरून तुमची पॉलिसी पुन्हा अॅक्टिव्ह करू शकता. एकूणच एलआयसी विविध पॉलिसींच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांना सर्वांगीण सुरक्षितता पुरवण्याचा प्रयत्न करत आहे. एलआयसी ही सरकारी विमा कंपनी असल्याने तिच्यावर सगळ्यांचा विश्वास आहे. त्यामुळे तुम्हीही विमा घेण्याचा विचार करत असाल तर या पॉलिसीविषयी अधिक माहिती घ्या.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: LIC , money
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात