मराठी बातम्या /बातम्या /मनी /लवकरात लवकर आधार करा तुमच्या PF खात्याशी लिंक, अन्यथा मिळणार नाही 7 लाखांची ही सुविधा

लवकरात लवकर आधार करा तुमच्या PF खात्याशी लिंक, अन्यथा मिळणार नाही 7 लाखांची ही सुविधा

EPFO Update- आता तुमच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) खात्यासह आधार कार्ड लिंक असणं 1 जूनपासून अनिवार्य आहे. EPFO ने Social Security code 2020 च्या सेक्शन 142 मध्ये बदल केले आहेत.

EPFO Update- आता तुमच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) खात्यासह आधार कार्ड लिंक असणं 1 जूनपासून अनिवार्य आहे. EPFO ने Social Security code 2020 च्या सेक्शन 142 मध्ये बदल केले आहेत.

EPFO Update- आता तुमच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) खात्यासह आधार कार्ड लिंक असणं 1 जूनपासून अनिवार्य आहे. EPFO ने Social Security code 2020 च्या सेक्शन 142 मध्ये बदल केले आहेत.

नवी दिल्ली, 11 जून: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) एका महत्त्वाच्या नियमात बदल केला आहे. आणि ईपीएफ खातेधारकांनी या नियमाचे पालन न केल्यास त्यांना मोठ्या समस्येला सामोरं जावं लागू शकतं. प्रत्येक खातेधारकाचं पीएफ खातं आधार कार्डला (Aadhar Card) लिंक असणं आवश्यक असणार आहे. 1 जूनपासून हा नियम लागू झाला आहे. सब्सक्रायबर्सचे UAN  (Universal account number) आधारसह लिंक असणं आवश्यक आहे. EPFO ने Social Security code 2020 च्या सेक्शन 142 मध्ये बदल केला आहे.  यामुळे ECR फाइलिंग प्रोटोकॉल बदलला आहे.

आधार कार्डशी लिंक नसल्यास होईल हे नुकसान

या नियमानंतर ईपीएफ खातेधारकाचं (Epfo account holders) खातं आधार कार्डाशी जोडलेलं नसेल तर ईपीएफ खात्यामध्ये एम्प्लॉयरचे (Employer) योगदान जमा होणार नाही. ही जबाबदारी तुम्हाला नियुक्त करणाऱ्या कंपनीची असणार आहे, त्यांनी प्रत्येक कर्मचाऱ्याला याबाबत सूचना देणं आवश्यक असेल. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या पीएफ खात्याशी आधार कार्ज लिंक केलं नसेल तर लवकरात लवकर हे काम पूर्ण करा. ईपीएफओने हे स्पष्ट केलं आहे की, ईपीएफची रक्कम अशा खात्यात जमा नाही होणार ज्याचे यूएएन आधारशी लिंक नसेल. एम्प्लॉयरचे योगदान न जमा होण्याबरोबरच खातेधारक त्याच्या पीएफ अकाउंटमधून रक्कम काढूही शकणार नाही.

हे वाचा-या महिन्यात आहे LPG गॅस सिलेंडर स्वस्तात खरेदी करण्याची संधी, पूर्ण करा हे काम

7 लाखाचा EDLI कव्हर मिळणार नाही

या नवीन नियमानंतर आधारशी तुमचं पीएफ खातं लिंक नसेल तर एम्प्लॉयी डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स (EDLI) देखील जमा होणार नाही. त्या कर्मचाऱ्याला EDLI कव्हर मिळणार नाही. ईपीएफओ सब्सक्रायबर्सना एम्प्लॉयी डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीम 1976 (EDLI) अंतर्गत कव्हर मिळतो. आता या इन्शुरन्स कव्हरची जास्तीत जास्त रक्कम 7 लाख झाली आहे. आधी या सुविधेमध्ये 6 लाखांचा कव्हर मिळत असे.

हे वाचा-या सरकारी बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी, महत्त्वाच्या सर्व्हिसमध्ये समस्या

कुणाला मिळतो EDLI चा लाभ?

EDLI स्कीमअंतर्गत मेंबरच्या नॉमिनीकडून केला जातो. कर्मचाऱ्याचा आजार, दुर्घटनेमुळे किंवा स्वाभाविक मृत्यू झाल्यास हा क्लेम करता येतो. या कव्हरचा लाभ त्या कर्मचाऱ्यांच्या पीडित कुटुंबाला मिळतो ज्याने मृत्यूच्या आधीच्या ठीक 12 महिन्यात एकापेक्षा अधिक प्रतिष्ठानांमध्ये नोकरी केली आहे. ही रक्कम एकरकमी दिली जाते. EDLI मध्ये कर्मचाऱ्याला कोणतीही रक्कम भरावी लागत नाही.

First published:

Tags: Epfo news, Money, Pf, PF Amount, Pf news, PF Withdrawal