जाहिरात
मराठी बातम्या / मनी / खूशखबर! या महिन्यात आहे LPG गॅस सिलेंडर स्वस्तात खरेदी करण्याची संधी, पूर्ण करा हे काम

खूशखबर! या महिन्यात आहे LPG गॅस सिलेंडर स्वस्तात खरेदी करण्याची संधी, पूर्ण करा हे काम

खूशखबर! या महिन्यात आहे LPG गॅस सिलेंडर स्वस्तात खरेदी करण्याची संधी, पूर्ण करा हे काम

LPG Gas Cylinder: तुमच्याकडे या महिन्यात एलपीजी गॅस सिलेंडर स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. सिलेंडरच्या खरेदीवर तुम्ही चांगली बचत करू शकता.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 11 जून: घरगुती गॅस सिलेंडर (LPG Gas Cylinder) च्या किंमती पेट्रोल-डिझेलच्या किंमतींप्रमाणे आसमंताला भिडत आहेत. मात्र या महिन्यात तुमच्याकडे स्वस्त दरात गॅस सिलेंडर खरेदी करण्याची संधी आहे. तुम्ही गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये थेट 800 रुपयांपर्यंतची बचत करू शकता. जाणून घ्या काय आहे ही ऑफर पेटीएमने (Paytm) एलपीजी गॅस सिलेंडरच्या ग्राहकांसाठी (LPG Customers) ही खास ऑफर आणली आहे. पेटीएमने ही बंपर ऑफर (Paytm Bumper Offer) सादर केली आहे. या ऑफर अंतर्गत ग्राहकांना 800 रुपयांपर्यंत सवलत मिळू शकते. जाणून घ्या कशा स्वरुपात तुम्हाला हा फायदा मिळेल. कशी मिळेल 800 रुपयांपर्यंतची सवलत? ही एक कॅशबॅक ऑफर आहे. पेटीएम ग्राहकांना 800 रुपयांपर्यंत कॅशबॅक ऑफर (Paytm Cashback Offer) देते आहे. ही ऑफर पहिल्यांदा बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना मिळेल. पहिल्यांदा एखाद्या ग्राहकाने App च्या माध्यमातून भारतगॅस बुक केला तर त्याला 800 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकतो. भारत पेट्रोलियमने देखील या ऑफरबाबत ट्वीट करत माहिती दिली आहे

जाहिरात

कशाप्रकारे कराल बुक? -तुमच्या मोबाइलमध्ये पेटीएम अॅप नसेल तर सर्वात आधी पेटीएम App डाउनलोड करा -पेटीएम अॅपमध्ये recharge and pay bills’ मध्ये जा हे वाचा- Gold Price: सोन्याचांदीच्या किंमतीत उसळी, आज या दराने होतेय सोनेविक्री -त्यानंतर ‘book a cylinder’ (बुक ए सिलेंडर) असा पर्याय निवडा -याठिकाणी तुम्हारा भारतगॅस प्रोव्हायडर म्हणून निवडावा लागेल -त्यानंतर रजिस्टर्ड मोबाइल क्रमांक किंवा तुमचा एलपीजी आयडी दाखल करा -यानंतर QR Code स्कॅन करून या ऑफरचा लाभ घेऊ शकता

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: LPG Price
  • First Published :
जाहिरात
जाहिरात