नवी दिल्ली, 10 जून: जर तुम्ही पंजाब नॅशनल बँकेचे (Punjab National Bank PNB) ग्राहक असाल आणि तुम्ही इंटरनेट बँकिंगचा (Internet Banking) वापर करत असाल तर ही तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांना ऑनलाइन बँकिंग, UPI च्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करताना काही समस्यांचा सामना करावा लागत आहे. यासंबंधात बँकेने एक ट्वीट करत माहिती दिली आहे. PNB ने ग्राहकांना सामोरं जावं लागत असलेल्या समस्यांबाबत माफी देखील मागितली आहे. शिवाय बँकेने ग्राहकांना आश्वासित केलं आहे की या समस्यांवर उपाययोजना केल्या जात आहेत.
वाचा काय म्हटलं PNB ने?
PNB ने एका ग्राहकाला टॅग करत एक ट्वीट केलं आहे, ज्याने बँकिंग संदर्भातील समस्या ट्विटरच्या माध्यमातून मांडली होती. ग्राहकाच्या या ट्वीटवर पंजाब नॅशनल बँकेने त्यांच्या अधिकृत अकाउंटवरुन रिप्लाय केला आहे. बँकेने यावेळी टेक्निकल इश्यू संदर्भाक भाष्य केलं आहे. बँकेने असे म्हटले आहे की, 'प्रिय ग्राहक, तुमच्या गैरसोयीबाबत आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. काही तांत्रिक कारणांमुळे आमच्या (इंटरनेट बँकिंग, UPI, App) सेवांमध्ये समस्या निर्माण झाल्या आहेत. दरम्यान टीम यावर काम करत आहे आणि लवकरच त्यावर उपाययोजना केली जाईल.'
Dear customer, we regret the inconvenience caused to you. Our (Internet Banking,UPI,APP) service(s) are facing glitches due to some technical difficulty. However, our team is working on the same and it will be resolved soon.
— Punjab National Bank (@pnbindia) June 10, 2021
पीएनबीने या ग्राहकाची तक्रार निवारण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान तुम्ही पीएनबी ग्राहक असाल आणि अशा समस्यांच्या सामना करत असाल तर तुम्ही देखील ट्विटरच्या माध्यमातून तुमची समस्या बँकेसमोर मांडू शकता.
हे वाचा-तुमच्याकडे सोन्याचे दागिने असतील तर अशी मिळवा अधिक रक्कम, लक्षात ठेवा या गोष्टी
PNB बचत खात्यावर देत आहे चांगला रिटर्न
तुम्ही पीएनबीच्या बचत खात्यामध्ये पैसे जमा केले असतील तर तुम्हाला त्यातून एक चांगला रिटर्न मिळवता येईल. सेव्हिंग अकाउंटवर पंजाब नॅशनल बँक सध्या सर्वाधिक व्याज देत आहे. पीएनबीचे व्याज दर 3% ते 3.50% आहेत. पंजाब नॅशनल बँकेमध्ये मिनिमम बॅलन्सची मर्यादा 500 ते 2000 रुपये आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bank