मुंबई, 28 नोव्हेंबर: तुम्हाला आर्थिक व्यवहारांसाठी पॅनकार्डचा वापर करावा लागतो. जर पॅनकार्ड आधारकार्डला लिंक केलं नसेल तर ते लवकरात लवकर करून घ्या. अन्यथा तुमचे पॅनकार्ड रद्द होऊ शकते आणि तुम्हाला दंडही भरावा लागू शकतो. जर तुमचे पॅनकार्ड 31 मार्च 2023 पर्यंत लिंक केले नाही तर आय़कर विभागाकडून पॅनकार्ड निष्क्रीय केलं जाईल. तुम्हाला 1 हजार रुपयांपर्यंत दंड केला जाऊ शकतो. यामुळे तुमच्या खिशाला कात्री लागू शकते.
आयकर विभागानं सांगितलं आहे की, 31 मार्च 2022 पर्यंत पॅन कार्डधारकांना आधारकार्डसह कागदपत्रे लिंक न केल्यास १ हजार रुपयांपर्यंत दंड केला जाईल. अशा कार्डधारकांना मार्च 2023 पर्यंत पॅनकार्ड वापरता येईल पण मार्च 2023नंतर कार्डची सेवा बंद केली जाईल. त्यानंतर तुम्हाला १ हजार रुपये दंड भरून आधारकार्ड पॅन कार्ड लिंक करावे लागेल.
पॅनकार्डला आधार कार्ड लिंक करण्याची अखेरची तारीख याआधी अनेकदा आयकर विभागाने वाढवली आहे. महत्वाची कागदपत्रे लिंक करण्याची शेवटची मुदत ही 31 मार्च 2022 अशी होती. सीबीडीटीने म्हटलं आहे की, ज्यांनी 1 जुलै 2017 पर्यंत पॅनकार्ड दिले गेले आहे आणि आधार कार्डसाठी जे पात्र आहेत त्यांना 31 मार्च 2023 पर्यंत किंवा त्याआधी दोन्ही कार्ड लिंक करणे आवश्यक आहे.
हेही वाचा: पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत एकदाच गुंतवा पैसे, व्याजावरच भागेल खर्च
पॅनकार्ड आणि आधार कार्ड लिंक केले नाही तर ते निष्क्रीय होईल आणि तुम्हाला जिथे पॅनकार्ड आवश्यक असेल ती कामे पूर्ण करता येणार नाहीत. आय़कर विभागाने सांगितलं की, यासाठी दंडाची रक्कम भरल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना आधार कार्डची माहिती दिल्यानंतर पुन्हा पॅनकार्ड सुरू केले जाऊ शकते.
पॅनकार्ड आधार कार्डला लिंक करण्यासाठी सर्वात आधी आय़कर विभागाच्या अधिकृत साइटवर जावे लागेल. पुन्हा आधार कार्डमध्ये दिलेलं नाव, पॅन क्रमांक, आधार क्रमांक टाका. त्यानंतर आधार कार्डवर नमूद केलेली जन्मतारखेवर टीक करा. कॅप्चा कोड टाकल्यानंतर सबमिट करा आणि त्यानंतर लिंक आधार बटणावर क्लिक करा. यानंतर तुमचा पॅन क्रमांक आधार कार्डशी लिंक होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aadhar Card, Pan Card