मराठी बातम्या /बातम्या /मनी /

पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत एकदाच गुंतवा पैसे, व्याजावरच भागेल खर्च

पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत एकदाच गुंतवा पैसे, व्याजावरच भागेल खर्च

पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत एकदाच गुंतवा पैसे, व्याजावरच भागेल खर्च

पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत एकदाच गुंतवा पैसे, व्याजावरच भागेल खर्च

Post Office SCS Scheme : पोस्ट ऑफिसच्या या योजनेत ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारनं 1 ऑक्टोबर 2022 पासून वार्षिक 7.6 टक्के व्याज (चक्रवाढ) केलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Suraj Sakunde

मुंबई, 28 नोव्हेंबर: जर तुम्हाला पोस्ट ऑफिस योजनांमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर तुमच्यासाठी ज्येष्ठ नागरिक बचत योजना सर्वोत्तम ठरू शकते. ही योजना प्रामुख्यानं ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशानं सुरू करण्यात आली आहे. या योजनेची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या योजनेत एकदाच पैसे गुंतवावे लागतात आणि मुदतपूर्तीनंतर तुम्हाला दर तिमाहीत निश्चित व्याज मिळू लागतं. पोस्ट ऑफिसची ही योजना 100 टक्के सुरक्षित आहे. बाजारात कितीही चढ-उतार आले तरी तुमच्या पैशावर कोणताही परिणाम होत नाही. त्यामुळं या योजनेत लोकांचं नुकसान होण्याची शक्यता नसते.

1 ऑक्टोबर 2022 पासून सरकारने पोस्ट ऑफिसच्या सीनिअर सिटीझन स्कीमवरील व्याज 7.6 टक्के प्रतिवर्ष (कंपाउंडिंग) केलं आहे. या योजनेची मॅच्युरिटी 5 वर्षे आहे. कंपाउंडिंग कॅल्क्युलेटरनुसार तुम्ही एकरकमी 5 लाख रुपये गुंतवल्यास मॅच्युरिटीवर तुमचा एकूण फंड सुमारे 7.21 लाख रुपये असेल. येथे तुम्हाला व्याज म्हणून 2.21 लाख रुपये मिळतील. अशा प्रकारे प्रत्येक तिमाहीत 11,058 रुपये व्याज चालू राहील.

पोस्ट ऑफिसच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, या योजनेत वार्षिक व्याज 7.6 टक्के असेल. यामध्ये 1000 रुपयांच्या पटीत ठेवी ठेवता येतात. तसेच यामध्ये जास्तीत जास्त 15 लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात. तसेच या स्कीममध्ये एकरकमी रक्कम गुंतवावी लागेल.

हेही वाचा : NPS मधील गुंतवणुकीत उत्तम परताव्याची संधी, दिवसाला 150 रुपये गुंतवल्यास निवृत्तीनंतर मिळतील 1 कोटी रुपये

या वयातील लोक उघडू शकतात खातं-

या योजनेअंतर्गत 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची व्यक्ती आपलं खातं उघडू शकते. जर एखाद्याचं वय 55 वर्षे किंवा त्याहून अधिक परंतु 60 वर्षांपेक्षा कमी असेल आणि त्याने VRS घेतलं असेल, तर तो SCSS मध्ये खातं देखील उघडू शकतो. परंतु त्याला सेवानिवृत्तीचे लाभ मिळाल्यापासून एक महिन्याच्या आत हे खातं उघडावं लागेल आणि त्यात जमा केलेली रक्कम ही सेवानिवृत्तीच्या लाभाच्या रकमेपेक्षा जास्त नसावी.

पती/पत्नी एकत्र खाते उघडू शकतात

SCSS अंतर्गत, ठेवीदार त्याच्या/तिच्या जोडीदारासह वैयक्तिकरित्या किंवा संयुक्तपणे एकापेक्षा जास्त खाती ठेवू शकतो. परंतु सर्व मिळून गुंतवणुकीची कमाल मर्यादा 15 लाखांपेक्षा जास्त असू शकत नाही. 1 लाखापेक्षा कमी रकमेसह खातं रोखीने उघडता येतं, परंतु त्यापेक्षा जास्त रकमेसाठी तुम्हाला चेकद्वारे पैसे द्यावे लागतील.

नॉमिनेशन सुविधा देखील उपलब्ध -

ज्येष्ठ नागरिक बचत योजनांमध्ये खातं उघडताना आणि बंद करताना नॉमिनेशन सुविधा उपलब्ध आहे. हे खातं एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या खात्यात हस्तांतरित केलं जाऊ शकतं. यामध्ये खातेदार खातं मुदतपूर्व बंद करू शकतात. परंतु पोस्ट ऑफिस खातं उघडल्याच्या 1 वर्षानंतर खातं बंद केल्यावर ठेवीतून फक्त 1.5 टक्के रक्कम कापली जाईल. तर 2 वर्षानंतर बंद केल्यावर ठेवीतील 1 टक्के रक्कम कापली जाईल.

कर सवलत-

SCSS खात्यातील ठेवींवर कर सवलतीचाही फायदा आहे. आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत, तुम्ही या योजनेतील गुंतवणुकीवर 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या कर सूटीचा दावा करू शकता. तथापि SCSS मधील व्याज उत्पन्न करपात्र आहे. जर तुमच्या सर्व SCSS चे व्याज उत्पन्न वार्षिक 50,000 रुपयांपेक्षा जास्त असेल, तर तुमचा TDS कापला जाऊ लागतो. कराची रक्कम तुमच्या व्याजातून वजा केली जाते. जर व्याज उत्पन्न विहित मर्यादेपेक्षा जास्त नसेल, तर तुम्ही फॉर्म 15G/15H सबमिट करून TDS मधून सूट मिळवू शकता.

First published:

Tags: Pension scheme, Personal finance, Post office, Savings and investments, Senior citizen