EPFO ने काय म्हटलं आहे? EPFOने नवीन मार्ददर्शक सूचना जारी करताना असे म्हटेल आहे की- प्रिय नियोक्ता, सामाजिक सुरक्षा संहिता, 2020 च्या कलम 142 लागू होण्यासह ECR केवळ त्याच सदस्यांच्या खात्यात दाखल करण्याची अनुमती आहे, ज्यांचा आधार नंबर आहे. 01.06.2021 पासून यूएएनसह आधार जोडलेले हवे. नियमानुसार सर्व योगदानकर्त्या सदस्यांसंदर्भात आधार सीडिंग सुनिश्चित करा, जेणेकरुन त्यांना ईपीएफओ संबंधित सेवांचा लाभ घेता येईल. हे वाचा-Gold Price Today: खूशखबर! रेकॉर्ड स्तरावरुन 7000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं आधारशी तुमचे EPF खाते कसे जोडाल? -सर्वात आधी EPFO च्या अधिकृत वेबसाइटवर जा -याकरता https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ यावर क्लिक करू शकता. -यानंतर UAN आणि पासवर्ड प्रविष्ट करुन लॉग इन करा -त्यानंतर Manage सेक्शनमध्ये KYC या पर्यायावर क्लिक करा -याठिकाणी तुम्हाला EPF अकाउंटमध्ये आधारसह कोणती कागदपत्र जोडणं आवश्यक आहे ते दिसेल -याठिकाणी आधारचा पर्याय निवडून आधार नंबर आणि आधारवरील तुमचं नाव टाइप करुन सर्व्हिसवर क्लिक करा -यानंतर तुम्ही दिलेली माहिती सुरक्षित होईल आणि तुमचं आधार UIDAI डेटाशी व्हेरिफाय होईल -तुम्ही दिलेली कागदपत्र योग्य असल्यास तुमचं आधार EPF खात्याशी लिंक होईल.EPFO has amended ECR filing protocol and from 01.06.2021 it can be filed only with respect to Aadhaar seeded UAN's.#EPFO #SocialSecurity #HumHainNa pic.twitter.com/8KCAmRMNEC
— EPFO (@socialepfo) June 7, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Money, Pf, PF Amount, Pf news, PF Withdrawal