मराठी बातम्या /बातम्या /मनी /वोटर आयडी आणि आधारकार्डबाबत केंद्र सरकरचा मोठा निर्णय, तुमच्यावर होणार परिणाम

वोटर आयडी आणि आधारकार्डबाबत केंद्र सरकरचा मोठा निर्णय, तुमच्यावर होणार परिणाम

आता केंद्र सरकारने वोटर आयडी आणि आधार कार्ड संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे.

आता केंद्र सरकारने वोटर आयडी आणि आधार कार्ड संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे.

आता केंद्र सरकारने वोटर आयडी आणि आधार कार्ड संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई : आधार आणि पॅनकार्ड लिंक करण्याची अंतिम मुदत 31 मार्च आहे. त्यानंतर पॅन कार्ड बंद होणार आहे. त्यामुळे आताच लिंक करून घ्या. यासोबत वोटर आयडी देखील तुमच्या आधारकार्डला लिंक करणं गरजेचं आहे. या वर्षी कर्नाटक राज्यात विधानसभा निवडणुका होत आहे. यासाठी दोन महिने बाकी आहेत. सगळे राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. याच दरम्यान केंद्र सरकारने एक मोठी घोषणा केली आहे.

आता केंद्र सरकारने वोटर आयडी आणि आधार कार्ड संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. जो तुमच्यासाठी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. वोटर आयडी आधारशी लिंक करण्याची मुदत वाढवली आहे. 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 पर्यंत ही वाढवण्यात आली आहे. याआधी वोटर आयडी आधारशी लिंक करणं बंधनकारक नव्हतं. तुम्ही घरी बसून ही दोन कागदपत्रे तुमच्या मोबाईलवर सहजपणे लिंक करू शकता.

'ही' कामं केली नसतील तर आत्ताच करा! अन्यथा होईल मोठे नुकसान, 31 मार्च आहे डेडलाईन

तुम्हालाही तुमच्या मोबाईलवरून वोटर आयडी आधारशी लिंक करायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअरवरून व्होटर हेल्पलाइन अॅप डाउनलोड करावे लागेल.

आता व्होटर हेल्पलाइन अॅप उघडा आणि 'मी सहमत आहे' पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर 'Next' वर क्लिक करा.

आता 'मतदार नोंदणी' वर क्लिक करा आणि नंतर 'इलेक्टोरल ऑथेंटिकेशन फॉर्म' वर क्लिक करा.

'Let's Start' दाबा नंतर तुमचा मोबाईल नंबर टाका आणि 'OTP पाठवा' वर क्लिक करा.

OTP पडताळणीनंतर, 'Yes I have Voter ID' असा पर्याय निवडा आणि नंतर 'Next' वर क्लिक करा.

आता तुमचा मतदार आयडी किंवा EPIC क्रमांक प्रविष्ट करा, राज्य निवडा आणि नंतर 'माहिती मिळवा' वर क्लिक करा आणि नंतर 'प्रोसीड' वर क्लिक करा.

पॅन कार्डची व्हॅलिडिटी कशी चेकं करायची? ही आहे सोपी प्रोसेस

स्क्रीनवर दर्शविलेले तुमचे तपशील सत्यापित करा आणि नंतर 'पुढील' वर क्लिक करा.

आता तुमचा आधार क्रमांक, मोबाईल नंबर, अर्जाचे ठिकाण टाका आणि नंतर 'पूर्ण' वर क्लिक करा.

यानंतर फॉर्म 6B पूर्वावलोकन पृष्ठ तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

तुमचे तपशील तपासा आणि नंतर फॉर्म 6B सबमिट करण्यासाठी 'Confirm' वर क्लिक करा.

First published:
top videos

    Tags: Aadhar Card, Aadhar card link, Aadhar card on phone, M aadhar card, Voters choice