मुंबई, 10 फेब्रुवारी : देशातील सर्वात मोठी जीवन विमा कंपनी LIC ने आपला इश्यू (LIC IPO) आणण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. LIC 11 फेब्रुवारी रोजी ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्ट्स (DRHP) सादर करणार आहे. सरकार किती स्टेक विकणार आहे, हे डीआरएचपी दाखल केल्यानंतर कळेल. सरकारने निर्णय घेतला आहे की इश्यूचा काही भाग एलआयसीच्या पॉलिसीधारकांसाठी (LIC Policy Holders) राखीव ठेवला जाईल. यासोबतच त्यांना यात काही सूटही दिली जाणार आहे. काही सूत्रांनी सांगितले की LIC च्या पॉलिसीधारकांना त्याचा IPO 5 टक्के कमी किमतीत मिळू शकतो. LIC चे मूल्य किती असू शकते? गेल्या आठवड्यात, गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभाग (DIPAM) सचिव तुहिन कांत पांडे यांनी सूचित केले होते की LIC या आठवड्यात इश्यूसाठी अर्ज सादर करू शकते. पांडे यांनी अलीकडेच रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की एलआयसीचे मूल्य 5 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकते. आणि त्याचे एंटरप्राइज मूल्य त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त असू शकते. एलआयसीचा डीआरएचपी जमा केल्यानंतर, सरकारला एलआयसीमध्ये किती स्टेक विकायचा आहे हे कळेल. Paytm ची भन्नाट ऑफर, UPI ट्रान्सफरवर मिळेल Cashback; असा घेता येईल फायदा या इश्यूनंतर एलआयसीची मालकी कोण राखणार? सध्या एलआयसीची मालकी सरकारकडे आहे. ही देशातील सर्वात मोठी जीवन विमा कंपनी आहे. सरकारला या कंपनीतील हिस्सेदारी विकून सुमारे 90,000 कोटी रुपये उभे करायचे आहेत. यामुळे चालू आर्थिक वर्षातील निर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात सरकारला मदत होईल. आयपीओनंतरही एलआयसीची मालकी सरकारकडेच राहणार आहे. कायद्यानुसार एलआयसीमध्ये सरकारची हिस्सेदारी 51 टक्क्यांपेक्षा कमी असू शकत नाही. याशिवाय, सरकार 5 वर्षांमध्ये LIC मधील 25 टक्क्यांहून अधिक स्टेक विकू शकत नाही. दरमहा 210 रुपये भरा अन् निवृत्तीनंतर 5 हजार रुपये मासिक पेन्शन मिळवा! देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC चा मार्केट शेअर 64.1 टक्के आहे. क्रिसिलच्या अहवालानुसार ही देशातील सर्वांत मोठी जीवन विमा कंपनी आहे. त्याचा इक्विटीवरील रिटर्न सर्वाधिक 82 टक्के आहेत. जीवन विमा प्रीमियम्सच्या बाबतीत ही जगातील तिसरी सर्वांत मोठी विमा कंपनी आहे. मार्केट शेअरबद्दल (Market shares) बोलायचं झाल्यास जगातील इतर कोणतीही विमा कंपनी नाही ज्याचा हिस्सा 64 टक्के आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.