जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Atal pension yojana: दरमहा 210 रुपये भरा अन् निवृत्तीनंतर 5 हजार रुपये मासिक पेन्शन मिळवा!

Atal pension yojana: दरमहा 210 रुपये भरा अन् निवृत्तीनंतर 5 हजार रुपये मासिक पेन्शन मिळवा!

Atal pension yojana: दरमहा 210 रुपये भरा अन् निवृत्तीनंतर 5 हजार रुपये मासिक पेन्शन मिळवा!

केंद्र सरकारची अटल पेन्शन योजना (Atal pension yojana) 2015 मध्ये सुरू झाली असून आतापर्यंत या योजनेशी 3.75 कोटींपेक्षा जास्त लोक जोडले गेले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 9 फेब्रुवारी : प्रत्येक नोकरदाराला निवृत्तीनंतर पेन्शनचा मोठा आधार असतो. पूर्वी केवळ सरकारी कर्मचाऱ्यांनाच निवृत्ती वेतनाची सोय होती. पण, आता खाजगी नोकरदारांनाही एका योजनेद्वारे पेन्शन (Atal pension yojana) मिळवता येते. केंद्र सरकारची अटल पेन्शन योजना (APY) लोकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. चालू आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 24 जानेवारीपर्यंत 71 लाखांहून अधिक लोक त्याच्याशी जोडले गेले आहेत, यावरून याचा अंदाज लावला जाऊ शकतो. केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. बी.के. कराड यांनी राज्यसभेत सांगितले की, 24 जानेवारी 2022 पर्यंत APY अंतर्गत 71,06,743 सदस्य जोडले गेले. 2020-21 या आर्थिक वर्षात 79 लाखांहून अधिक ग्राहक या योजनेशी जोडले गेले होते. 2018-19 मध्ये 70 लाख लोकांनी यात सहभाग घेतला. या योजनेत सामील होणाऱ्यांची संख्या आता 3.75 कोटींच्या पुढे गेली आहे. अटल पेन्शन योजना काय आहे? Atal pension yojana अटल पेन्शन योजनेंतर्गत वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यावर दरमहा 1000 ते 5000 रुपये पेन्शन मिळते. यामध्ये 18 वर्षे ते 40 वयोगटातील व्यक्ती गुंतवणूक करू शकतात. जर एखाद्या व्यक्तीने ही योजना घेतली तर त्याला किमान 20 वर्षे गुंतवणूक करावी लागेल. योजनेत सामील होण्यासाठी, बचत बँक खाते, आधार आणि सक्रिय मोबाइल क्रमांक असणे आवश्यक आहे. दरमहा 1 ते 5 हजार रुपये पेन्शन मिळवण्यासाठी ग्राहकाला 42 ते 210 रुपये दरमहा द्यावे लागतील. तुमचे योगदान तुमच्या वयानुसार ठरवले जाते निवृत्तीनंतर तुम्हाला किती पेन्शन हवी आहे यावर किती रक्कम कापली जाईल हे अवलंबून असेल. दरमहा 1 ते 5 हजार रुपये पेन्शन मिळवण्यासाठी ग्राहकाला 42 ते 210 रुपये दरमहा द्यावे लागतील. वयाच्या 18 व्या वर्षी योजना घेतल्यावर हे होईल. दुसरीकडे जर एखाद्या ग्राहकाने वयाच्या 40 व्या वर्षी ही योजना घेतली तर त्याला 291 रुपये ते 1454 रुपये प्रति महिना मासिक योगदान द्यावे लागेल. ग्राहक जितका जास्त योगदान देईल तितके जास्त निवृत्तीनंतर त्याला पेन्शन मिळेल. यामध्ये तुम्ही कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या कर लाभाचा दावा करू शकता. LIC Jeevan Labh Policy: दररोज 262 रुपये गुंतवा, मॅच्युरिटीवर मिळतील तब्बल 20 लाख! तुम्ही तुमच्या सोयीनुसार हप्ता भरू शकता या योजनेअंतर्गत, गुंतवणूकदार मासिक, त्रैमासिक किंवा अर्ध-वार्षिक म्हणजेच 6 महिन्यांच्या कालावधीत गुंतवणूक करू शकतात. योगदान ऑटो-डेबिट केले जाईल. म्हणजेच, निश्चित रक्कम तुमच्या खात्यातून आपोआप कापली जाईल आणि तुमच्या पेन्शन खात्यात जमा केली जाईल. ऑनलाइन उघडू शकता खाते तुमचे SBI मध्ये खाते असल्यास तुम्ही नेट बँकिंगद्वारे या योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज करण्यासाठी तुम्हाला प्रथम SBI मध्ये लॉग इन करणे आवश्यक आहे. त्यानंतर ई-सर्व्हिसेस e-Services लिंकवर क्लिक करा. नवीन विंडोमध्ये सामाजिक सोशल सिक्योरिटी नावाने एक लिंक असेल. तिथे तुम्हाला क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला PMJJBY/PMSBY/APY असे 3 पर्याय दिसतील. येथे तुम्हाला APY म्हणजेच अटल पेन्शन योजना वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती भरावी लागेल. ज्यामध्ये योग्य खाते क्रमांक, नाव, वय आणि पत्ता इत्यादी द्यावा लागेल. पेन्शन पर्यायांमध्ये तुम्ही कोणते निवडत आहात, म्हणजे रुपये 5000 किंवा रुपये 1000 मासिक. त्यानंतर तुमचे मासिक योगदान तुमच्या वयाच्या आधारे ठरवले जाईल. बँकेत जाऊनही खाते उघडता येते. तुम्ही कोणत्याही बँकेत खाते उघडू शकता. तुम्हाला अटल पेन्शन योजनेचा फॉर्म भरावा लागेल आणि विनंती केलेल्या कागदपत्रांसह बँकेच्या शाखेत जमा करावा लागेल. अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला एक पुष्टीकरण संदेश मिळेल. त्यानंतर तुमचे मासिक योगदान तुमच्या वयाच्या आधारे ठरवले जाईल. त्यानंतर तुमचे मासिक योगदान तुमच्या वयाच्या आधारे ठरवले जाईल. ही योजना 2015 मध्ये सुरू झाली सरकारची ‘अटल पेन्शन योजना’ 9 मे 2015 रोजी सुरू झाली. ही योजना पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA) द्वारे चालविली जाते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात