नवी दिल्ली, 29 जुलै: जर तुम्ही चांगल्या भविष्यासाठी गुंतवणुकीचा (Investment Planning) विचार करत असाल तर एलआयसीकडून काही चांगल्या स्कीम्स ऑफर केल्या जात आहे. तुम्ही देखील एखाद्या पेन्शन योजनेमध्ये (Pension scheme) गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर एलआयसीची सरल पेन्शन योजना (LIC Saral Pension Plan) एक चांगला पर्याय ठरू शकतो. यामध्ये तुम्हाला प्रीमियम एकदाच भरावा लागतो, त्यानंतर वयाच्या साठाव्या वर्षानंतर तुम्हाला दरमहा 12000 रुपये मिळतील. जाणून घ्या या योजनेचे इतर फायदे काय आहेत.
काय आहे योजना?
एलआयसीची सरल पेन्शन योजना दोन प्रकारची आहे. पहिला प्रकार असा आहे की- लाइफ अॅन्युइटी विथ 100 परसेंट रिटर्न ऑफ परचेज प्राइस आणि दुसरा पर्याय असा आहे की- पेन्शन योजना जॉइंट लाइफ.
हे वाचा-Gold: सोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण, 1000 रुपयांपेक्षा अधिक दराने उतरली चांदी
लाइफ अॅन्युइटी विथ 100 परसेंट रिटर्न ऑफ परचेज प्राइस (Life Annuity with 100 percent return of purchase price) ही पेन्शन योजना सिंगल लाइफसाठी आहे. अर्थात ही योजना कोणत्याही एका व्यक्तीसाठी असेल, त्याला पेन्शन मिळत राहील. त्यानंतर नॉमिनीला बेस प्रीमियम मिळेल.
पेन्शन योजना जॉइंट लाइफ (Pension scheme joint life) मध्ये पती-पत्नी दोघांना पेन्शन मिळेल. यामध्ये पती आणि पत्नीपैकी दीर्घकाळ जी व्यक्ती हयात राहते तिला पेन्शन मिळते. जेव्हा दोघांचाही मृत्यू होतो तेव्हा नॉमिनीला बेस प्रीमियम मिळेल.
हे वाचा-5 वर्षात 3 लाखांचे झाले 11 लाख, तुम्ही देखील 100 रुपयांपासून करू शकता गुंतवणूक
सरल पेन्शन योजनेच्या खास बाबी
1. विमाधारकाने पॉलिसी घेतल्यानंतर लगेच त्याचं पेन्शन सुरू होतं
2. पॉलिसी घेणाऱ्यावर हे अवलंबून आहे की तुम्हाला पेन्शन मासिक हवं आहे, तिमाही, सहामाही की वार्षिक हवं आहे
3. ही योजना तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने खरेदी करू शकता.
4. या योजनेत तुम्हाला वार्षिक कमीतकमी 12000 रुपये गुंतवावे लागतील, अधिकाधिक गुंतवणुकीची मर्यादा नाही आहे
5. ही योजना 40 ते 80 वर्षापर्यंतच्या लोकांसाठी आहे
6. ही पॉलिसी सुरू करण्याच्या तारखेच्या सहा महिन्यानंतर पॉलिसी होल्डर कधीही यावर कर्ज घेऊ शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Investment, LIC, Savings and investments