जाहिरात
मराठी बातम्या / मनी / LIC ची आधार स्तंभ पॉलिसी, 30 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळेल लाखोंचा परतावा

LIC ची आधार स्तंभ पॉलिसी, 30 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळेल लाखोंचा परतावा

LIC ची आधार स्तंभ पॉलिसी, 30 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळेल लाखोंचा परतावा

आधार स्तंभ पॉलिसी संरक्षण आणि बचत दोन्ही पुरवते. हा प्लान फक्त पुरुषांसाठी आहे आणि हा LIC प्लान खरेदी करण्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 9 जून : LIC ही भारतातील सर्वात मोठी आणि जुनी विमा कंपन्यांपैकी एक आहे. एलआयसी वेगवेगळ्या लोकांसाठी नवनवीन प्रकारच्या पॉलिसी (LIC Policy) लाँच करत असते, जेणेकरून लोकांना परवडणाऱ्या दरात विम्याचा लाभ मिळावा, शिवाय त्यांच्या गुंतवणुकीवर (Investment) चांगला परतावा मिळावा. एलआयसीकडे पॉलिसीधारकांची संख्या सर्वाधिक आहे. अशा परिस्थितीत लोकांच्या गरजेनुसार कंपनी वेळोवेळी नवनवीन पॉलिसी आणत असते. या पॉलिसींद्वारे सर्वसामान्यांना बचतीबरोबरच सुरक्षिततेचाही मोठा आधार मिळतो. एलआयसीची आधार स्तंभ पॉलिसी (LIC Aadhaar Stambh Policy) त्यापैकीच एक आहे. ही योजना सर्वसामान्यांसाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. या प्लॅनच्या वैशिष्ट्याबद्दल सांगायचे तर, जर तुम्ही येथे दररोज फक्त 30 रुपये गुंतवले तर मॅच्युरिटीनंतर तुम्हाला सुमारे 4 लाख रुपये मिळतील. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यात मृत्यू लाभ आणि इतर सुविधाही उपलब्ध आहेत. मृत्युपत्रातल्या या 6 चुकांमुळे तुमची ‘इच्छा’ होऊ शकते अवैध! जाणून घ्या सविस्तर आधार स्तंभ पॉलिसी संरक्षण आणि बचत दोन्ही पुरवते. हा प्लान फक्त पुरुषांसाठी आहे आणि हा LIC प्लान खरेदी करण्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे. एलआयसीच्या या लहान बचत योजनेमध्ये काही रायडर्सना मृत्यू आणि मॅच्यरिटी लाभ देखील आहेत. ही एक प्रकारची नॉन-लिंक्ड आणि प्रॉफिट एंडोमेंट अॅश्युरन्स योजना आहे. पॉलिसी धारकाचा पॉलिसीची मुदत संपण्यापूर्वी मृत्यू झाल्यास, त्याच्या नॉमिनीला मृत्यू लाभ मिळू शकतो. जे कुटुंबाच्या भविष्यातील गरजा पूर्ण करण्यात मदत करेल. तसेच पॉलिसीधारकांना मॅच्युरिटी लाभ मिळतो, जो एकत्रितपणे दिला जातो. धोनी ‘या’ कंपन्यांमधूनही करतो कमाई; किती आणि कोणत्या कंपन्यांमध्ये धोनीची गुंतवणूक कोण घेऊ शकतं पॉलिसी? आधार स्तंभ पॉलिसी घेण्यासाठी पॉलिसीधारकाचे वय 8 ते 55 वर्षांच्या दरम्यान असावे. योजनेच्या मुदतपूर्तीच्या वेळी अर्जदाराचे कमाल वय 70 वर्षांपेक्षा जास्त नसावे. दुसरीकडे, आधारस्तंभ पॉलिसी अंतर्गत ऑफर केलेली किमान मूळ रक्कम 75,000 रुपये आहे तर कमाल मूळ रक्कम 3,00,000 रुपये आहे. यामध्ये, मूळ रक्कम 5,000 रुपयांच्या पटीत दिली जाते. ही पॉलिसी 10 ते 20 वर्षांसाठी आहे. त्याची खास गोष्ट म्हणजे या प्लॅन अंतर्गत जोखीम कव्हरेज पॉलिसी जारी केल्याच्या तारखेपासून लगेच सुरू होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: investment , LIC , money
  • First Published :
जाहिरात
जाहिरात