मराठी बातम्या /बातम्या /मनी /धोनी 'या' कंपन्यांमधूनही करतो कमाई; किती आणि कोणत्या कंपन्यांमध्ये धोनीची गुंतवणूक

धोनी 'या' कंपन्यांमधूनही करतो कमाई; किती आणि कोणत्या कंपन्यांमध्ये धोनीची गुंतवणूक

महेंद्रसिंग धोनीने अलीकडेच ड्रोन स्टार्टअप गरुडा एरोस्पेससोबत जोडला गेला आहे. त्यांचे 26 शहरांमध्ये 300 हून अधिक ड्रोन आणि 500 ​​पायलट कार्यरत आहेत.

महेंद्रसिंग धोनीने अलीकडेच ड्रोन स्टार्टअप गरुडा एरोस्पेससोबत जोडला गेला आहे. त्यांचे 26 शहरांमध्ये 300 हून अधिक ड्रोन आणि 500 ​​पायलट कार्यरत आहेत.

महेंद्रसिंग धोनीने अलीकडेच ड्रोन स्टार्टअप गरुडा एरोस्पेससोबत जोडला गेला आहे. त्यांचे 26 शहरांमध्ये 300 हून अधिक ड्रोन आणि 500 ​​पायलट कार्यरत आहेत.

मुंबई, 8 जून : क्रिकेटपटू्च्या करिअरला 35-40 व्या वर्षी पूर्णविराम मिळतो. फिटनेसनुसार आणि कामगिरीतील सातत्या यावर देखील ते अवलंबून असतं. मात्र 35-40 वर्षात निवृत्ती, मग त्यानंतर हे दिग्गज क्रिकेटर काय करत असतील असा प्रश्न अनेकांना पडत असेल. तर टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीकडे बघून तुम्हाला याचा अंदाज येईल. महेंद्रसिंग धोनी अलीकडेच ड्रोन स्टार्टअप गरुडा एरोस्पेससोबत जोडला गेला आहे. त्यांचे 26 शहरांमध्ये 300 हून अधिक ड्रोन आणि 500 ​​पायलट कार्यरत आहेत.

या कंपनीने धोनीला ब्रँड अॅम्बेसेडरही बनवले आहे. धोनी म्हणाला, गरुडा एरोस्पेसचा एक भाग बनून मला आनंद होत आहे आणि त्यांनी ऑफर केलेल्या अनोख्या ड्रोन सोल्यूशन्ससह त्यांची वाढ पाहण्यास मी उत्सुक आहे. गरुडा एरोस्पेस व्यतिरिक्त, धोनीने इतर अनेक कंपन्यांमध्येही गुंतवणूक केली आहे. अशाच काही कंपन्यांवर एक नजर टाकूया.

खाताबूक (Khatabook)

Khatabook लाँच झाल्यानंतर अल्पावधीतच 5 कोटींहून अधिक व्यापारी त्याच्याशी जोडले गेले. धोनीने 2020 मध्ये आपल्या एका वक्तव्यात म्हटले होते की खतबुक ग्राऊंड लेव्हलवर बदल घडवून आणण्यास सक्षम आहे.

इथेनॉल मिश्रित पेट्रोल नेमकं कसं असतं? वाहनांसाठी ते फायदेशीर की हानिकारक?

7 इंक ब्रूस (7 ink brews)

ही एक खाद्य आणि पेय बनवणारी कंपनी आहे. या कंपनीचा शेअरहोल्डर असण्यासोबतच धोनी त्याचा ब्रँड अॅम्बेसेडरही आहे. कंपनीने गेल्या वर्षी कॉप्टर 7 या ब्रँड नावाखाली चॉकलेट आणि शीतपेयांची मालिका सुरू केली. धोनीच्या हेलिकॉप्टर शॉट आणि जर्सी नंबरवरून हे नाव पडले आहे.

कार्स 24 (Cars 24)

धोनीने 2019 मध्ये या कंपनीत गुंतवणूक केली होती. ही कंपनी 2015 मध्ये सुरू झाली आणि वापरलेल्या कारच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार करते.

होमलेन (HomeLane)

घरांच्या इंटिरिअर डिझायनिंगच्या कामात गुंतलेली ही कंपनी आहे. धोनीने 2021 मध्ये या कंपनीत गुंतवणूक केली होती. ही कंपनी 2014 मध्ये सुरू झाली.

Repo Rate Hike: रेपो रेट वाढीनंतर घर आणि कार लोनचा EMI किती वाढणार? कॅल्क्युलेशन पाहा

हॉटेल माही रेसिडेन्सी (Hotel Mahi Residency)

धोनी झारखंडच्या रांची येथील हॉटेल माही रेसिडेन्सीचा मालक असल्याचे फार कमी लोकांना माहिती आहे. हे धोनीचे मूळ गाव आहे. या हॉटेलची कोणतीही फ्रेंचायझी नाही.

स्पोर्ट्सफिट वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड (Sportsfit World Pvt)

या कंपनीची मालकी धोनीकडे आहे. ही कंपनी भारतभर 200 हून अधिक जिम चालवते जी स्पोर्ट्सफिट वर्ल्ड नावाने चालवली जाते.

First published:

Tags: Money, MS Dhoni, Startup