जुनं मृत्युपत्र नष्ट न करणं - नवीन मृत्युपत्र करण्यासाठी जुन्या मृत्युपत्राच्या सर्व प्रती नष्ट करणं अत्यंत आवश्यक आहे.
फसवणूक - जर न्यायालयात हे सिद्ध झालं की, मृत्यूपत्र फसवणूक करून किंवा कोणाच्या प्रभावाखाली तयार केलं गेलं असेल, तर ते अवैध ठरतं.
अप्रमाणित मृत्युपत्र (non attested) - मृत्युपत्र किमान 2 साक्षीदारांनी प्रमाणित केलं नाही तर, ते अवैध ठरतं.
मानसिक स्थिती योग्य किंवा तयार असणं/नसणं - जर मृत्यूपत्र तयार करणाऱ्याची मानसिक स्थिती चांगली नसेल तर ती व्यक्ती मृत्युपत्र किंवा इच्छापत्र मिळू शकत नाही. याशिवाय 18 वर्षांखालील व्यक्तीही मृत्यूपत्र बनवू शकत नाही.
मृत्युपत्र करणार्याची स्वाक्षरी - मृत्युपत्र करणार्या व्यक्तीने जर त्यावर स्वाक्षरी केली नसेल तर ते मृत्युपत्र अवैध ठरतं. तसंच, त्याची पडताळणी करण्यासाठी फक्त अंगठ्याचा ठसा पुरेसा आहे.
तारीख नसणं - जर मृत्युपत्रावर कोणत्याही तारखेचा उल्लेख नसेल, तर त्यातील सर्व काही बरोबर असलं तरीही ते अवैध ठरतं. जर इच्छापत्र अवैध असेल तर, नातेसंबंधांच्या आधारे मालमत्तेची विभागणी केली जाते.