मुंबई, 7 फेब्रुवारी : लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनचा (LIC- Life Insurance Corporation) IPO आणण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. आयपीओसाठी एलआयसीच्या संचालक मंडळात सहा स्वतंत्र संचालकांचा समावेश करण्यात आला आहे. एलआयसीने माजी वित्तीय सेवा सचिव अंजुली छिब दुग्गल, सेबीचे माजी सदस्य जी. महालिंगम आणि एसबीआय लाइफचे माजी व्यवस्थापकीय संचालक संजीव नौटियाल, चार्टर्ड अकाउंटंट विजय कुमार, राजकमल आणि व्हीएस पार्थसारथी यांचा संचालक मंडळात समावेश केला आहे. आता एलआयसीच्या संचालक मंडळातील स्वतंत्र संचालकांची संख्या नऊ झाली आहे. ICICI बँक क्रेडिट कार्ड यूजर्सना झटका, 10 फेब्रुवारीपासून अनेक चार्जेस वाढणार पॉलिसीधारकांसाठी आरक्षण दरम्यान LIC च्या IPO मधील 10 टक्के पॉलिसीधारकांसाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याची बातमी आहे. तुमच्याकडे LIC ची कोणतीही पॉलिसी असल्यास IPO मिळण्याची शक्यता जास्त आहे. गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे (Dipam) सचिव तुहिन कांता पांडे यांनी सांगितले होते की, सेबीच्या मंजुरीनंतर एलआयसीचा आयपीओ मार्चमध्ये येऊ शकतो. ते म्हणाले की एलआयसीच्या इश्यूच्या 10 टक्क्यांपर्यंत पॉलिसीधारकांसाठी राखीव असेल. LIC चे देशात लाखो पॉलिसीधारक आहेत आणि या IPO मध्ये त्यांना स्वस्तात शेअर्स मिळण्याची मोठी संधी आहे. एलआयसीचे मूळ मूल्य तयार केले गेले आहे आणि ते 5 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. इश्यूचा आकार DRHP मध्ये नमूद केला जाईल. दीपमचे सचिव तुहिन कांत पांडे यांनी सांगितले की, या IPO मध्ये रिटेल विंडो अंतर्गत काही आरक्षणे देखील ठेवण्यात आली आहेत. आमच्याकडे पॉलिसीधारकांसाठी आरक्षणाची तरतूद आहे. आम्ही एलआयसी कायद्यांतर्गत अशी तरतूद केली आहे की पॉलिसीधारकांना काही सवलतीत 10 टक्क्यांपर्यंत शेअर्स ऑफर केले जाऊ शकतात. या IPO मध्ये LIC कर्मचाऱ्यांसाठीही आरक्षण असेल. किरकोळ गुंतवणूकदार आणि कर्मचार्यांसाठी देखील काही सूट अपेक्षित आहे. LIC च्या प्रस्तावित IPO मध्ये सर्वसामान्यांच्या सहभागाला सरकार प्रोत्साहन देऊ इच्छित असल्याने छोट्या गुंतवणूकदारांना सवलत दिली जाऊ शकते. Petrol Diesel Prices Today: महाराष्ट्रातील या शहरात सर्वाधिक पेट्रोल दर, तपासा मुंबई-पुण्यातील लेटेस्ट रेट पॉलिसीधारकांना पत्र LIC ने आपल्या पॉलिसीधारकांना IPO मध्ये सहभागी होण्यासाठी पत्र लिहून जागरूक केले आहे. कंपनीने त्यांना आयपीओमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांचा पॅन क्रमांक अपडेट करण्यास सांगितले आहे. एलआयसी पॉलिसीधारकांना जाहिरातीद्वारे पॅन अपडेट करण्यासाठी देखील सूचित करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.