मराठी बातम्या /बातम्या /मनी /

प्रीमियम न भरल्यानं पॉलिसी बंद झालीये? LIC देत आहे डिस्काउंट ऑफर

प्रीमियम न भरल्यानं पॉलिसी बंद झालीये? LIC देत आहे डिस्काउंट ऑफर

प्रीमियम न भरल्यानं पॉलिसी बंद झालीये? LIC देत आहे डिस्काउंट ऑफर

प्रीमियम न भरल्यानं पॉलिसी बंद झालीये? LIC देत आहे डिस्काउंट ऑफर

LIC च्या या अभियानाअंतर्गत, ULIP व्यतिरिक्त इतर सर्व प्रकारच्या पॉलिसी पहिल्या प्रीमियममध्ये डिफॉल्ट झाल्याच्या तारखेपासून 5 वर्षांच्या कालावधीत काही अटींच्या अधीन राहून पुनरुज्जीवित केल्या जाऊ शकतात.

  • Published by:  Suraj Sakunde
मुंबई, 18 ऑगस्ट: जर तुमच्याकडे भारतीय आयुर्विमा महामंडळाची (LIC) एखादी पॉलिसी असेल, जी काही कारणानं मध्येच बंद किंवा लॅप्स झाली (Lapsed Policies) असेल, तर तुम्हाला अशी पॉलिसी पुन्हा सुरु करण्याची उत्तम संधी आहे. वास्तविक एलआयसीनं बंद झालेल्या वैयक्तिक विमा पॉलिसींना पुनरुज्जीवित करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. बुधवारपासून ही मोहीम सुरू झाली आहे. 21 ऑक्टोबरपासून सुरू करता येणार पॉलिसी- एलआयसीनं मंगळवारी जारी केलेल्या निवेदनात असं म्हटलं आहे की, या विशिष्ट मोहिमेअंतर्गत ULIP वगळता सर्व पॉलिसी विलंब शुल्कासह पुन्हा सुरु केल्या जाऊ शकतात. या मोहिमेअंतर्गत पॉलिसीधारकांना विलंब शुल्कातही सूट दिली जाणार आहे. देशातील सर्वात मोठ्या विमा कंपनी असलेल्या एलआयसीकडून सांगण्यात आलं आहे की, ही मोहीम 17 ऑगस्टपासून सुरू होईल आणि 21 ऑक्टोबर 2022 पर्यंत चालेल. या पॉलिसींवर 100 टक्के सूट- पीटीआयच्या म्हणण्यानुसार, एलआयसीकडून सांगण्यात आलं आहे की, पॉलिसीधारकाला सूक्ष्म विमा पॉलिसीसाठी (Micro Insurance Policies) विलंब शुल्कात 100 टक्के सूट मिळेल, जेणेकरून त्याची जोखीम कव्हर केली जाऊ शकते. हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की, या मोहिमेअंतर्गत, ULIP व्यतिरिक्त इतर सर्व प्रकारच्या पॉलिसी पहिल्या प्रीमियममध्ये डिफॉल्ट झाल्याच्या तारखेपासून 5 वर्षांच्या कालावधीत काही अटींच्या अधीन राहून पुनर्जीवित केल्या जाऊ शकतात. म्हणजेच नॉन-यूलिप नसलेल्या सर्व पॉलिसी सुरु केल्या जाऊ शकतात. हेही वाचा- ATM मधून पैसे काढणे झाले महाग, वाचा तुमची बँक किती आकारणार चार्ज म्हणून सुरू केली मोहीम- जे पॉलिसीधारक कोणत्या ना कोणत्या कारणानं प्रीमियम भरू शकले नाहीत आणि त्यामुळं त्यांची विमा पॉलिसी बंद करण्यात आली, अशा पॉलिसीधारकांसाठी एलआयसीनं ही मोहीम सुरू केली आहे. कंपनीनं या मोहिमेची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे. एलआयसीनं केलेल्या ट्विटमध्ये असं सांगण्यात आलं की कंपनी पॉलिसीधारकांना त्यांची लॅप्स झालेली पॉलिसी पुन्हा जिवंत करण्यासाठी संधी देत ​​आहे. प्रीमियमवर उपलब्ध असेल अशी सूट- एलआयसीच्या मते, या मोहिमेअंतर्गत पॉलिसीधारकांना 1 लाख रुपयांपर्यंतच्या एकूण प्रीमियमवर विलंब शुल्कात 25 टक्के सूट दिली जाईल. या सूटची कमाल मर्यादा 2,500 रुपये असेल. याशिवाय, 1 ते 3 लाख रुपयांच्या एकूण प्रीमियमसाठी कमाल सूट रक्कम 3,000 रुपये निश्चित करण्यात आली आहे. जर आपण 3 लाख रुपयांपेक्षा जास्त प्रीमियमवरील विलंब शुल्काबद्दल बोलायचं झाल्यास प्रीमियमच्या 30 टक्के किंवा 3,500 रुपयांची कमाल सूट मिळेल. एलआयसीचा पहिल्या तिमाहीत नफा- अलीकडेच, एलआयसीने आर्थिक वर्ष 2022-23 च्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले होते. या अंतर्गत, कंपनीने एप्रिल-जून तिमाहीत 682.9 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. त्याच वेळी, गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत एलआयसीचा नफा केवळ 2.6 कोटी रुपये होता. मात्र, तिमाही आधारावर विमा कंपनीच्या नफ्यात घट झाली आहे. कारण मार्च तिमाहीत LIC चा निव्वळ नफा 2,371.5 कोटी रुपये होता. त्रैमासिक निकालानंतर एलआयसीकडून असं सांगण्यात आलं की येत्या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात चढ-उतार होणार आहेत. शेअर बाजारात निराशा-  या वर्षी मे महिन्यात LIC ने देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा IPO आणला होता. मात्र, त्यामुळे गुंतवणूकदारांची निराशा झाली. कंपनीने स्टॉकसाठी 949 रुपयांची वरची किंमत बँड निश्चित केली होती. पण, त्यांची शेअर बाजारात लिस्टिंग सवलतीने झाली. लिस्टिंग झाल्यापासून शेअर्समध्ये घसरण झाली. गुंतवणूकदारांच्या हितासाठी अनेक पावले उचलण्याचा दावा कंपनी करत आहे.
First published:

Tags: LIC, Policy

पुढील बातम्या