मराठी बातम्या /बातम्या /मनी /ATM मधून पैसे काढणे झाले महाग, वाचा तुमची बँक किती आकारणार चार्ज

ATM मधून पैसे काढणे झाले महाग, वाचा तुमची बँक किती आकारणार चार्ज

ATM मशिनमधून प्रत्येक महिन्यात ठराविक संख्येपेक्षा जास्त वेळा पैसे काढले तर त्यावर अतिरिक्त चार्ज आकारला जातो.

ATM मशिनमधून प्रत्येक महिन्यात ठराविक संख्येपेक्षा जास्त वेळा पैसे काढले तर त्यावर अतिरिक्त चार्ज आकारला जातो.

ATM मशिनमधून प्रत्येक महिन्यात ठराविक संख्येपेक्षा जास्त वेळा पैसे काढले तर त्यावर अतिरिक्त चार्ज आकारला जातो.

  मुंबई, 18 ऑगस्ट :  आपले पैसे सुरक्षित रहावे म्हणून ते आपण बँकेत ठेवतो. गरजेनुसार, वेळेनुसार आपण ते पैसे काढू शकतो आणि त्यांचा वापर करू शकतो. आपल्याला बँकिंग सेवा देणाऱ्या बँका त्याचं शुल्क (Fee for transactions) आकारत असतात. काही सेवा मोफत असल्या तरीही इतर सेवांचे पैसे आपल्या बँक खात्यातून कापले जातात. पैसे नसतील तर ते जमा झाले की कापले जातात. आपले पैसे बँकेतून काढण्यासाठी सर्वांत सोयीचा मार्ग म्हणजे एटीएम मशीन (ATM Machine). या मशीनमधून पूर्वी कितीही वेळा पैसे काढता येत होते. पण सर्व सार्वजनिक आणि खासगी बँकांनी आता दरमहा मोफत  मर्यादा ग्राहकांना घालून दिली आहे.

  या व्यवहार संख्येपेक्षा जास्त ट्रॅन्झॅक्शन केलं की बँका शुल्क आकारतात. मोफत व्यवहारांची (Free ATM Transactions) मर्यादा संपल्यानंतर एटीएम यंत्रातून रक्कम काढण्याव्यतिरिक्त व्यवहार केले तरीही हे शुल्क लागू होतं. तुमच्याकडे असलेल्या डेबिट कार्डवरून (Debit Card) तुम्हाला किती मोफत व्यवहार करायला परवानगी असते याबद्दल माहिती जाणून घेऊ या. एनडीटीव्ही इंडियाने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) जून 2021 मध्ये प्रसिद्ध केलेल्या नोटिफिकेशननुसार खातेदाराने एटीएम यंत्रातून दर महिन्याच्या ठरलेल्या मोफत ट्रॅन्झॅक्शन्सपेक्षा अधिक केलेल्या प्रत्येक ट्रॅन्झॅक्शनवर 21 रुपये शुल्क आकारण्याची परवानगी बँकांना दिली आहे. हा नियम 1 जानेवारी 2022 पासून लागू होईल असं त्या नोटिफिकेशनमध्ये म्हटलं होतं. त्यानुसार तो लागू झाला आहे.

  Business Idea : OLA सोबत घरबसल्या कमावू शकता चांगला पैसा, अशी आहे प्रोसेस

  या आधी ग्राहकांचं खातं असलेल्या एटीएममधून दरमहा 5 ट्रॅन्झॅक्शन्स करण्याची परवानगी होती. खातं नसलेल्या दुसऱ्या बँकेच्या एटीएममध्ये ट्रॅन्झॅक्शन करण्याची मर्यादा 3 होती. जादाच्या प्रत्येक व्यवहारावर 20 रुपये शुल्क (Paid ATM Transactions)आकारायला बँकांना परवानगी होती. तसंच मेट्रो शहरात राहत नसलेल्या ग्राहकांना दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून 5 व्यवहार करायला परवानगी होती.

  1 ऑगस्ट 2022 पासून रिझर्व्ह बँकेने बँकांना प्रत्येक आर्थिक ट्रॅन्झॅक्शनसाठी 17 रुपये तर आर्थिक व्यवहार नसलेल्या ट्रॅन्झॅक्शनसाठी 6 रुपये शुल्क आकारण्याची परवानगी दिली आहे. ही फी बँका सर्व ठिकाणच्या एटीएममधील व्यवहारांसाठी आकारू शकतात. बँका एटीएम केंद्रांची संख्या वाढवत आहेत. ही केंद्र सुरू करणं आणि त्यांच्या रखरखावाच्या खर्चापोटी बँका एटीएम सर्व्हिस चार्ज (Service Charges) ग्राहकांकडून गोळा करतात.

  वडिलांच्या संपत्तीत मुलीला समान वाटा मिळतो का? कायदा नेमकं काय सांगतो?

  सर्व बँका डेबिट किंवा एटीएम कार्डाच्या सेवेसाठी ग्राहकांकडून वार्षिक फी ही घेतात.SBI, PNB, HDFC Bank, ICICI Bank and Axis Bank या बँकांकडून आकारल्या जाणाऱ्या विविध फींची माहिती खाली दिली आहे.

  एसबीआय डेबिट कार्डची वार्षिक फी 125 रुपये घेते आणि दरमहा 5 आर्थिक ट्रॅन्झॅक्शन त्यांच्या एटीएममधून इतर बँकांच्या एटीएममधून 3 व्यवहार मोफत करण्याची परवानगी देते त्यापेक्षा अधिकच्या आर्थिक ट्रॅन्झॅक्शनला प्रत्येकी 20 रुपये शुल्क आकारते.

  पीएनबी डेबिट कार्डची वार्षिक फी 150 रुपये घेते आणि दरमहा 3 आर्थिक-गैरआर्थिक ट्रॅन्झॅक्शन मोफत करण्याची परवानगी देते. त्यापेक्षा अधिकच्या आर्थिक ट्रॅन्झॅक्शनला प्रत्येकी 20 रुपये शुल्क आकारते.

  एचडीएफसी बँक दरमहा 5 आर्थिक-गैरआर्थिक ट्रॅन्झॅक्शन मोफत करण्याची परवानगी देते. त्यापेक्षा अधिकच्या आर्थिक ट्रॅन्झॅक्शनला प्रत्येकी 21 रुपये शुल्क आकारते. आयसीआयसीआय दरमहा 4 आर्थिक ट्रॅन्झॅक्शन मोफत करण्याची परवानगी देते. त्यापेक्षा अधिकच्या आर्थिक ट्रॅन्झॅक्शनला प्रत्येकी 21 रुपये शुल्क आकारते.

  अ‍ॅक्सिस बँक दरमहा 4 आर्थिक ट्रॅन्झॅक्शन किंवा दीड लाख रुपये काढणं यापैकी जे आधी पूर्ण होईल ते गृहित धरते. तोपर्यंत सेवा मोफत देते. म्हणजे तुम्ही 3 व्यवहारांत दीड लाख रुपये काढले तर चौथं ट्रॅन्झॅक्शनही चार्जेबल होतं. अधिकच्या आर्थिक ट्रॅन्झॅक्शनला प्रत्येकी 21 रुपये शुल्क आकारते.

  First published:
  top videos

   Tags: ATM, Money