जाहिरात
मराठी बातम्या / मनी / LIC पॉलिसीवरही घेऊ शकता पर्सनल लोन, व्याजदर किती? अर्ज कसा करायचा?

LIC पॉलिसीवरही घेऊ शकता पर्सनल लोन, व्याजदर किती? अर्ज कसा करायचा?

LIC पॉलिसीवरही घेऊ शकता पर्सनल लोन, व्याजदर किती? अर्ज कसा करायचा?

LIC पॉलिसीवर घेतलेल्या वैयक्तिक कर्जावरील व्याजदर इतर वित्तीय संस्थांच्या तुलनेत कमी आहे. सध्या त्याचा व्याजदर 9 टक्क्यांपासून सुरू होतो आणि कर्जाची मुदत 5 वर्षे आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 8 डिसेंबर : जर तुम्ही भारतीय आयुर्विमा निगम अंतर्गत (Life Insurance Corporation) कोणतीही पॉलिसी घेतली असेल, तर तुम्ही त्यावर वैयक्तिक कर्ज (Personal Loan) देखील घेऊ शकता. लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) त्यांच्या ग्राहकांना पॉलिसीवर वैयक्तिक कर्ज घेण्यास परवानगी देते. या वैयक्तिक कर्जाचा व्याजदर (Interest Rate) सरकारी आणि खाजगी बँकांपेक्षा खूपच कमी आहे. एलआयसीकडून पॉलिसीवर दिलेला वैयक्तिक कर्जाचा व्याज दर 9 टक्क्यांपासून सुरू होतो. मात्र तुम्हाला किती कर्ज मिळेल हे तुमच्या उत्पन्नावर अवलंबून आहे. एलआयसी पॉलिसीवर कर्ज घेऊ शकता LIC पॉलिसीवर घेतलेल्या वैयक्तिक कर्जावरील व्याजदर इतर वित्तीय संस्थांच्या तुलनेत कमी आहे. सध्या त्याचा व्याजदर 9 टक्क्यांपासून सुरू होतो आणि कर्जाची मुदत 5 वर्षे आहे. येथे उपलब्ध वैयक्तिक कर्जाची खास गोष्ट म्हणजे जर तुम्ही कर्जाच्या मुदतीपूर्वी पेमेंट केले तर शुल्क शून्य आहे. म्हणजेच, मुदतीपूर्वी कर्जाची परतफेड केल्यास, नंतर कोणतेही वेगळे शुल्क भरावे लागणार नाही. तुमच्या खिशातली 500 रुपयांची ‘ती’ नोट खोटी आहे? तथ्य जाणून घ्या EMI बद्दल सांगायचे झाल्यास, जर एखाद्या व्यक्तीने 9 टक्के दराने 1 लाख रुपयांचे कर्ज घेतले असेल आणि त्याची मुदत 1 वर्षासाठी निश्चित केली असेल, तर 8745 रुपयांची EMI लागू होईल. जर कर्ज 2 वर्षांसाठी घेतले असेल तर EMI 4568 रुपये असेल. दुसरीकडे, 5 वर्षांसाठी कर्ज घेतल्यास, EMI ची रक्कम 2076 रुपये असेल. 5 लाखांचे कर्ज घेण्यासाठी EMI किती असेल? जर तुम्ही 5 लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज घेतले आणि एक वर्षासाठी कर्ज घेत असाल तर EMI रक्कम 44191 रुपये असेल. 2 वर्षांच्या कालावधीसाठी 23304 रुपये EMI असेल. 3 वर्षांसाठी 18472 रुपये, 4 वर्षांसाठी 15000 आणि 5 वर्षांसाठी 12917 रुपये असेल. दोन हजाराच्या नोटा बाजारात कमी का झाल्या? अखेर केंद्र सरकारने खरं कारण सांगितलं कर्ज कसे घेऊ शकता? जर तुम्हाला एलआयसी पॉलिसीवर वैयक्तिक कर्ज घ्यायचे असेल, तर तुम्ही एलआयसीच्या वेबसाइटवर जाऊन अधिक माहिती मिळवू शकता. तेथे तुम्ही कर्जासाठी अर्ज करू शकता. ऑनलाइन फॉर्म भरा आणि डाउनलोड करा. भरलेल्या फॉर्मवर स्वाक्षरी केल्यानंतर, तो स्कॅन करा आणि एलआयसी वेबसाइटवर अपलोड करा. यानंतर तुमच्या अर्जाची विमा महामंडळाकडून पडताळणी केली जाईल आणि कर्ज देण्याची प्रक्रिया सुरू होईल. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, संपूर्ण कर्जाची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: LIC , loan , money
  • First Published :
जाहिरात
जाहिरात