मराठी बातम्या /बातम्या /मनी /कमी पैशात मिळेल दुप्पट फायदा, LIC च्या या योजनेत एकदाच गुंतवणूक करून मिळवा चांगला रिटर्न

कमी पैशात मिळेल दुप्पट फायदा, LIC च्या या योजनेत एकदाच गुंतवणूक करून मिळवा चांगला रिटर्न

कमी पैशात जास्त फायदा देणारा LIC चा प्लॅन

कमी पैशात जास्त फायदा देणारा LIC चा प्लॅन

कोरोनामुळे (Corona) निर्माण झालेली परिस्थिती पाहता मिळकतीचे पर्याय म्हणून लोक गुंतवणुकीकडे (Investment) पाहू लागले आहेत. गुंतवणुकीचा चांगला पर्याय म्हणून भारतीय जीवन विमा निगमच्या (Life Insurance Corporation) एका स्कीमचा फायदा होऊ शकतो.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 01 मे: कोरोनामुळे (Corona) निर्माण झालेली परिस्थिती पाहता मिळकतीचे पर्याय म्हणून लोक गुंतवणुकीकडे (Investment)  पाहू लागले आहेत. गुंतवणुकीचा चांगला पर्याय म्हणून भारतीय जीवन विमा निगमच्या (Life Insurance Corporation) एका स्कीमचा फायदा होऊ शकतो. कमी गुंतवणूक आणि जास्त फायदा मिळवून देणारी ही स्कीम आहे. एलआयसी निवेश प्लस योजना (LIC Nivesh Plus Plan)  सिंगल प्रीमियम नॉन प्रीमियम, नॉन पार्टिसिपेटिंग, यूनिट-लिंक्ड आणि वैयक्तिक जीवन विमा आहे, जो पॉलिसीच्या कालावधीत विम्यासह गुंतवणूक करण्याचा पर्याय देखील देतो. ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने आपण हा प्लॅन खरेदी करू शकतो. पॉलिसी विकत घेणाऱ्यांसाठी बेसिक आणि अश्योर्ड पद्धतीनेही निवडू शकता. सम अश्योर्ड हा पर्याय सिंगल प्रीमियम 1.25 पटीत किंवा सिंगल प्रीमियमच्या 10 पट आहे.

4 पद्धतीचे फंड

या प्लॅनमध्ये 4 पद्धतीचे  फंड उपलब्ध आहेत. बॉन्ड फंड, सिक्योर्ड फंड, बॅलन्स्ड फंड आणि ग्रोथ फंड या चारही पर्यायांमध्ये तुम्ही गुंतवणूक करु शकता. सम अश्योर्ड हा पर्याय सिंगल प्रीमियम 1.25 पटीत किंवा सिंगल प्रीमियमच्या 10 पट आहे

पात्रता

एलआयसी इन्व्हेस्टमेंट प्लस योजना घेण्यासाठी किमान वयाची अट ही 90 दिवस ते 70 वर्षे आहे.

(हे वाचा-सर्वात मोठ्या खाजगी बँकेत होणार महत्त्वाचे बदल, ग्राहकांवर काय होणार परिणाम?)

टेन्योर आणि प्रीमियम लिमिट

पॉलिसीचा टेन्योर कालावधी 10 ते 35 वर्षे आणि लॉक-इन पिरेड 5 वर्षांचा असतो. प्रीमियमची किमान मर्यादा (Minimum Limit) 1 लाख रुपये आहे, तर कमाल मर्यादा (Maximum Limit) नाही. कमाल Maturity साठीचे वय 85 वर्षे आहे.

मॅच्योरिटी बेनिफिट्स

पॉलिसीधारक पॉलिसी मुदतीपर्यंत हयात असल्यास, त्याला मॅच्युरिटी बेनिफिट मिळतं, जो युनिट फंड मूल्याच्या बरोबरीचा असतो. पॉलिसीची मुदत संपल्यानंतर तो मिळतो.

फ्री-लुक पीरियड

कंपनी आपल्या ग्राहकांना एक फ्री-लुक कालावधी ऑफर करते. यावेळी ग्राहक पॉलिसी परत करू शकतात. जर पॉलिसी थेट कंपनीकडून खरेदी केली गेली असेल तर 15 दिवस आणि ऑनलाईन खरेदी असेल तर 30 दिवसांचा फ्री-लुक कालावधी लागू होतो.

(हे वाचा-SBI च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी खूशखबर! तुमच्या गृहकर्जावरील EMI झाला कमी)

डेथ बेनिफिट

पॉलिसीच्या कालावधीत विमाधारकाचा मृत्यू झाल्यास, नॉमिनीला डेथ बेनिफिटचा लाभ मिळण्याचा हक्क असतो. जर जोखीम सुरू होण्याच्या तारखेपूर्वी पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर युनिट फंड मूल्याच्या समान रक्कम परत मिळते..

पार्शियल विड्रॉअल

एलआयसी इन्व्हेस्टमेंट प्लस योजनेत कंपनी सहाव्या पॉलिसी वर्षानंतर ग्राहकांना काही प्रमाणात पैसे काढण्याची परवानगी देते. अल्पवयीन मुलांच्या बाबतीत,18 वर्षांच्या वयानंतर अंशतः पैसे काढण्याची परवानगी मिळते. .

First published:
top videos

    Tags: Investment, LIC, Money, Tax benifits