नवी दिल्ली, 01 मे : देशातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक एचडीएफसी (HDFC Bank) मध्ये मोठे संघटनात्मक बदल होणार आहेत. यामुळे बँकेची स्थिती सुधारेल आणि ग्राहकांनाही फायदा होईल, असे सांगण्यात येत आहे. शशी जगदीशन यांनी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रबंध निर्देशक पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सात महिन्यांनंतर व्यापक संघटनात्मक बदलांची घोषणा केली आहे.
असा मिळणार ग्राहकांना लाभ
एचडीएफसी (HDFC Bank) बँकेकडून दिलल्या एका निवेदनानुसार बँकेचे व्यावसायिक कार्यक्षेत्र, सप्लाय चॅनल, तंत्रज्ञान आणि डिजिटल अशी पुनर्रचना करण्यात आली आहे. यासह बँकेने वरिष्ठ नेतृत्वाच्या भूमिकांमध्येही बदल केले आहेत. कॉर्पोरेट बँकिंगचे सध्याचे समूह प्रमुख राहुल शुक्ला यांना कमर्शियल बँकिंग आणि ग्रामीण कार्यक्षेत्र सोपवण्यात आले आहे. जगदीशन यांनी म्हटले आहे की, आम्ही येत्या काळातील संधींचा पूर्णपणे लाभ घेता यावा, यासाठी चांगली कौशल्ये आणि तंत्रज्ञान आणि डिजिटल रूपांतरणाच्या आधारावर विकास आणि विस्ताराचे इंजिन तयार करत आहोत. या नवीन सुरू करण्यात आलेल्या योजनेला प्रोजेक्ट फ्युचर रेडी (Project - Future Ready) असे नाव देण्यात आले आहे.
हे वाचा - या बँकेच्या ग्राहकांना झटका! बचत खात्यावरील व्याज दरात 2% कपात, आजपासून नवे दर
त्यांनी दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, येणाऱ्या काळात विविध ग्राहक क्षेत्रांतील संधींचा पूर्ण लाभ घेण्यासाठी केंद्रित असलेले व्यावसायिक कार्यक्षेत्र आणि वितरण प्रणालीची स्थापना करण्यात आली आहे. जगदीशन म्हणाले, 'मला खात्री आहे की, ही संरचना आवश्यक रणनीती ठरवण्याची आणि तिच्या प्रभावी अंमलबजावणीची क्षमता तयार करेल. संपूर्ण भारतात किरकोळ, एमएसएमई (MSME) आणि कॉर्पोरेट क्षेत्रांमध्ये आमच्या ग्राहकांना सेवा देण्यासाठी याची आम्हाला गरज आहे.'
हे वाचा - भारतरत्न लता मंगेशकर यांनी दिली मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 7 लाखांची मदत
काय आहेत इतर बँकांचे व्याज दर?
सध्या खासगी क्षेत्रातील बँकांपैकी आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) ठेवींवर 3 ते 3.5% टक्के व्याज दर देत आहे. एसबीआय (SBI) 2.7 टक्क्यांचा व्याज दर देत आहे. बर्याच खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका सध्या बचतींवर 3 ते 3.5 टक्के परतावा देत आहेत. खात्यावर एक लाखांपर्यंतची रक्कम असल्यास फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक (Fincare small finance bank) 5%, आरबीएल बँक (RBL Bank) 4.75%, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक 4%, उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक 4%, इक्विटास स्मॉल फायनान्स 3.5 % आणि बंधन बँक 3% व्याज दर देत आहे. एक लाखाहून अधिकच्या ठेवींसाठी स्मॉल इक्विटास आणि उज्जीवन स्मॉल फायनान्स प्रत्येकी 7 टक्के व्याज दर देत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bank services, Hdfc bank, Money, Personal banking