मराठी बातम्या /बातम्या /मनी /

SBI च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी खूशखबर! तुमच्या गृहकर्जावरील EMI झाला कमी

SBI च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी खूशखबर! तुमच्या गृहकर्जावरील EMI झाला कमी

कोरोना विषाणूची (Corona virus) सध्या साथ सुरू असली तरी  आपण घर विकत घेण्याचा विचार करत असल्यास आपल्यासाठी एक चांगली बातमी आहे. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) गृह कर्जावरील व्याज दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 1 मे: कोरोना विषाणूची (Coronavirus) सध्या साथ सुरू असली तरी या दरम्यान तुम्ही घर विकत घेण्याचा विचार करत असल्यास तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) गृह कर्जावरील व्याज दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. एसबीआयने शनिवारी जाहीर केलेल्या निवेदनात ही घोषणा केली आहे. बँकेच्या गृह कर्जावरील व्याज दर 6.70 टक्के पासून सुरू होत आहेत.

जाणून घ्या गृहकर्जाचे नवे दर

30 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावरील व्याज दर 6.7% पासून सुरू होतील. 30 लाख ते 75 लाख रुपयांपर्यंतच्या गृह कर्जावरील व्याज दर 6.95 टक्क्यांपासून सुरू होत असल्याचे बँकेने म्हटले आहे. याशिवाय, 75 लाख रुपयांपेक्षा जास्त कर्जावर बँक 7.05 टक्के व्याज आकारणार आहे, असे एसबीआयने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

हे वाचा - Oxygen crisis : कोरोना वॉर्डच रुग्णांना देणार प्राणवायू; स्वतः तयार करणार ऑक्सिजन

एसबीआयने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, महिलांना यामध्ये 5 बीपीएस (बेसिस पॉईंट) सवलत मिळेल. कर्ज घेणाऱ्या महिलांना 0.05 टक्क्यांची विशेष सवलत दिली जाणार असल्याचे बँकेने म्हटले आहे.

योनो वापरकर्त्यांनाही सूट

याखेरीज योनो अॅप (YONO App) वापरकर्त्यांनाही खास सवलत देण्यात येणार असल्याचे बँकेने म्हटले आहे. एसबीआयने म्हटले आहे की, योनो अॅपद्वारे ग्राहकांची संख्या वाढविण्यासाठी आमच्या गृह कर्जाच्या ग्राहकांकडून डिजिटल प्रोत्साहन म्हणून 0.05 टक्के सूट देण्यात येत आहे

हे वाचाया बँकेच्या ग्राहकांना झटका! बचत खात्यावरील व्याज दरात 2% कपात, आजपासून नवे दर लागू

हे काम पूर्ण करण्यासाठी SBI ग्राहकांकडे 31 मे पर्यंत वेळ

लॉकडाऊनमुळे अनेक ग्राहकांना केवायसी अपडेट करण्यात अडचण येत होती. एसबीआयने केवायसी अपडेट करण्याची तारीख पुढे ढकलून ग्राहकांना दिलासा दिला आहे.

आता ग्राहकांची खाती केवायसी नसल्यामुळे 31 मेपर्यंत फ्रीझ होणार नाहीत. शिवाय रजिस्टर्ड इमेल किंवा पोस्टाच्या माध्यमातून पाठवण्यात आलेली कागदपत्र देखील केवायसी साठी ग्राह्य धरली जातील

First published:

Tags: SBI, SBI Bank News, Sbi home loan