जाहिरात
मराठी बातम्या / मनी / रोजचे भरा फक्त 74 रुपये आणि मिळवा 10 lakh, जाणून घ्या LIC च्या नव्या पॉलिसीचे Details

रोजचे भरा फक्त 74 रुपये आणि मिळवा 10 lakh, जाणून घ्या LIC च्या नव्या पॉलिसीचे Details

रोजचे भरा फक्त 74 रुपये आणि मिळवा 10 lakh, जाणून घ्या LIC च्या नव्या पॉलिसीचे Details

LIC New Policy: एलआयसी (LIC) एक नवीन स्कीम घेऊन आलेली आहे. तुम्हाला पैशांच्या बचतीसह (Saving) आर्थिक सुरक्षाही (Financial Security) मिळणार आहे.

नवी दिल्ली, 14 जुलै: कोरोनाकाळात कित्येक जणांचे कुटूंब आर्थिकदृष्ट्या कोलमडलेले असताना एलआयसी (LIC) एक नवीन स्कीम घेऊन आलेली आहे. ज्यामध्ये तुम्ही प्रति दिन 74 रूपये गुंतवणूक करून 10 लाख रूपये मिळवू शकणार आहात. तुम्हाला पैशांच्या बचतीसह (Saving) आर्थिक सुरक्षाही (Financial Security) मिळणार आहे. काय आहे ही स्कीम? एलआयसीच्या नवीन जीवन आनंद पॉलिसीमध्ये (News Jeevan Anandd Policy) ग्राहकांना प्रति दिन 74 रू. म्हणजेच महिन्याला 2220 रू. भरावे लागणार आहेत. या पॉलिसीचा कालावधी 15 ते 35 वर्षांचा असणार आहे. वय वर्षे 18 ते 50 वयोगटातील कोणतीही व्यक्ती ही पॉलिसी घेऊ शकते. या स्कीममध्ये कमीत कमी 1 लाख रूपयांची सम ॲश्युअर्ड (Sum Assured) घेणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त तुम्ही कितीही सम ॲश्युअर्ड घेऊ शकता, त्यास मर्यादा नाही. या स्कीमअंतर्गत पेमेंट करण्याचे स्वरूप काय आहे? या पॉलिसीसाठी तुम्ही, वार्षिक, सहामाही, तिमाही स्वरूपात पेमेंट करू शकता. तसेच पॉलिसी खरेदी केल्यानंतर तीन वर्षांमध्ये तुम्ही पॉलिसीवर कर्जही घेऊ शकता. मॅच्युरिटीवेळी तुम्हाला सम ॲश्युअर्डसह सिंपल रिवर्सनरी बोनस (Simple Reversionary Bonus) आणि फायनल ॲडिशनल बोनसचाही (Additional Bonus) लाभ मिळेल.

याठिकाणी पैसे गुंतवणारे झाले करोडपती! 1 लाखाच्या बदल्यात मिळाला 1 कोटींचा रिटर्न, तुमच्याकडेही आहे संधी

मॅच्युरिटीच्या वेळी खालीलप्रकारे 10 लाख रूपये मिळतील समजा एखाद्या व्यक्तीने 21 वर्षांसाठी 5 लाख रूपयांच्या सम ॲश्युअर्डसह न्यू जीवन आनंद पॉलिसी खरेदी केली तर त्याला मॅच्युरिटीच्या वेळी 5 लाख रूपये सम ॲश्युअर्ड + 5.04 लाख रूपयांचा सिंपल रिवर्सनरी बोनस आणि 10 हजार रूपयांचा ॲडिशनल बोनस मिळेल. सिंपल रिवर्सनरी बोनस हा प्रतिवर्षाला प्रति हजार 40 ते 48 रू. इतका असतो. तर फायनल ॲडिशनल बोनस हा प्रति हजार रूपयांवर 20 रू. इतका असतो. त्यामुळे संबंधित व्यक्तीला पॉलिसीच्या मॅच्यरिटीच्या वेळी 5 लाख + 5.04 लाख + 10 हजार = 10.14 लाख असे एकूण दहा लाख रूपये मिळू शकतात.

CNG Price Hike: सामन्यांना मोठा झटका! CNG आणि घरगुती पाइपलाइन गॅसच्या किंमतीत वाढ

जर पॉलिसी मॅच्युअर (Matured) झाल्यानंतर विमाधारकाचा मृत्यु झाला तर वारसदारास 5 लाख रुपयांची सम ॲश्युअर्ड रक्कम मिळते आणि पॉलिसीदरम्यान मृत्यू झाला तर एकूण विमा रकमेच्या 125 % रक्कम मिळते. तसेच बोनस आणि अंतिम बोनसही मिळतो. जर 17 वर्षे प्रिमियम भरून पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर वारसदारास (Nominee) खालीलप्रकारे रक्कम मिळते. » सम ॲश्युअर्डच्या 125% रक्कम = 5 लाखांच्या 125% रक्कम= 6,25,000 रू. » वार्षिक प्रीमियमच्या 10 पट रक्कम = (27010 रू. ची 10 पट रक्कम) = 3,02,730 रू. » मृत्युपर्यंत भरलेल्या प्रिमियमच्या 105% = (27010 * 17) चे 105% = 4,82,128 रू. यापैकी जी रक्कम सर्वाधिक असेल ती वारसदारास मिळेल. या पॉलिसीअंतर्गत टॅक्स बेनिफिट्सही मिळतात. इनकम टॅक्स ऍक्टच्या 80C विभागानुसार (Income Tax Act Section - 80C) अंतर्गत मॅच्युरिटी किंवा मृत्यूच्या वेळी मिळणाऱ्या रकमेवर कोणताही कर भरावा लागत नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: investment , LIC , money
  • First Published :
जाहिरात
जाहिरात